झोपेतून लवकर उठायचे आहे ...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 19:41 IST2016-03-20T02:41:39+5:302016-03-19T19:41:39+5:30
रात्री झोपतांना अनेकजण विचार करतात की, सकाळी सहा वाजता उठू.

झोपेतून लवकर उठायचे आहे ...?
प ंतु, कितीही विचार केला तरीही सात वाजतातच. दररोज हे अनेकांसोबत घडतेच, काहीकेल्या सकाळी अंथरुन सोडावेच वाटत नाही. वेळेवर उठण्यासाठी या काही खास टिप्स
उठण्याच्या वेळेचाच अलार्म लावा : काही लोक त्यांना सकाळी ७ वाजता उठावयाचे असेल तर ते ६ किंवा ६:३० अलार्म लावतात. त्यांना वाटते अलार्म वाजल्यानंतर बंद करुन आपल्या ठरलेल्या वेळेला उठू. परंतु, ही चुकीची सवय आहे. त्याकरिता जेव्हा आपल्याला उठायचे त्या वेळचाच अलार्म लावावा.
अलार्म अंतरावर ठेवा : उठण्याच्या वेळीला जरी आपण अलार्म लावलेला असला तरीही, अनेकदा तो जवळच असल्याने,आपण तो बंद करतो. व पुन्हा झोपी जातो, यामुळे आपले वेळेवर उठणे होत नाही. याकरिता अंतरावर असलेला अलार्म बंद करण्यासाठी आपल्याला उठून चालत जावे लागते. त्यामुळे आपण चालल्यानंतर पुन्हा झोपत नाही.
खिडकीचा पडदा हटवावा : रात्रीला झोपण्यापूर्वी खिडकीचा पडदा काढून टाकावा. त्यामुळे सकाळी सूर्यांचे किरणे आपल्यावर आल्यानंतर आपल्या लगेच जाग येईल.
दररोज वेळेवर झोपा : अनेकजण उद्या सुटी आहे, म्हणून रात्री उशीरा झोपतात. त्यामुळेही सकाळी उठायला उशीर होतो. त्याकरिता दररोज वेळवर झोपणे हीच चांगली सवय आहे.
व्यायाम : ज्यांना दररोज सकाळी उठून व्यायाम करण्याची सवय असते. असे लोक दररोज सकाळी लवकर उठतात. त्याकरिता व्यायामाची सवय करा.
जादा पाणी प्या : सकाळी लवकर उठण्यासाठी जादा पाणी पिणे आवश्यक आहे. उठल्यानंतरही एका तासाच्या आत पाणी प्या. त्याचा सकाळी लवकर उठण्यासाठी फायदा होतो.