​सेलिब्रिटींसारखे गुलाबी ओठ हवे आहेत? थंडीत अशी घ्या काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST2017-11-28T10:44:36+5:302018-06-23T12:03:12+5:30

ऋतूमानाचा परिणाम आपल्या ओठांवर दिसून येतो. हिवाळ्यात तर ओठाच्या बऱ्याच समस्या निर्माण होतात.

Want pink celebrity like celebrity? Take care to be cool! | ​सेलिब्रिटींसारखे गुलाबी ओठ हवे आहेत? थंडीत अशी घ्या काळजी !

​सेलिब्रिटींसारखे गुलाबी ओठ हवे आहेत? थंडीत अशी घ्या काळजी !

ण नेहमी पाहत असतो की, प्रत्येक अभिनेत्री आपले सौंदर्य टिक विण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतात. विशेष म्हणजे चेहऱ्याच्या सौंदर्याला ते जास्त प्राधान्य देतात. मात्र चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते ते आपल्या ओठांमुळे. मात्र ऋतूमानाचा परिणाम आपल्या ओठांवर दिसून येतो. हिवाळ्यात तर ओठाच्या बऱ्याच समस्या निर्माण होतात.  

हिवाळ्याला आरोग्यदायी ऋतू म्हटले जाते. मात्र या ऋतूमध्ये तुम्ही आरोग्याची काळजी व्यवस्थित घेतली नाही तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. हिवाळ्यात तापमान कमी झाल्याने थंडीच्या दिवसात आरोग्याकडे खासकरुन त्वचेकडे लक्ष देण्याची फार गरज असते. थंडीच्या दिवसात आपण पाणी कमी पितो, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. परिणामी त्वचा कोरडी पडते, ओठ फाटतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही घरगुती टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे ओठ आणि त्वचेची योग्य काळजी घेऊ शकता. ओठ फाटल्यानंतर ओठांवरील निघालेली त्वचा काढू नका. असे केल्यास ओठ आणखीन फाटण्याची शक्यता असते तसेच दुखापतही होऊ शकते.

फाटलेल्या ओठांना सॉफ्ट आणि मऊ ठेवण्यासाठी मध एक चांगला उपाय आहे. फाटलेल्या ओठांवर दररोज २-३ वेळा मध लावा. थोडसा मध रात्री झोपण्यापूर्वी लावण्यानेही फायदा होतो. एक चमचा दूध आणि १ चमचा मध एकत्रित करुन हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर थंड झालेले मिश्रण ओठांवर हलक्या हाताने लावा. ओठांना लीप लोशन किंवा लीप बाम लावून घराबाहेब पडावे. दिवसातून २-३ वेळा ओठांवर आॅलिव्ह आॅइल किंवा खोबरेल तेल लावल्यास फुटलेल्या ओठांना काहीसा आराम मिळतो. हिवाळ्यात अतिशय थंड पाण्याने आंघोळ करू नका, त्यामुळे त्वचा जास्त कोरडी पडू शकते. कोणतेही सौदर्य प्रसाधन वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या.  

Web Title: Want pink celebrity like celebrity? Take care to be cool!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.