​गुडघेदुखीपासून मुक्तता हवी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 20:03 IST2016-03-23T03:03:35+5:302016-03-22T20:03:35+5:30

गुडघे दुखीची समस्या ही खूप वेदनादायी असते.

Want to get rid of knee jerk? | ​गुडघेदुखीपासून मुक्तता हवी?

​गुडघेदुखीपासून मुक्तता हवी?

ाची पन्नाशी पार  करणाºयांमध्ये  हे प्रमाण मोठे आहे.  परंतु, कधी -कधी ही समस्या तरुणांनाही असल्याचे अलीकडे पाहावयाला मिळत आहे. गुडघेदुखीपासून मुक्तता मिळविण्यासाठी विविध घरगुती उपाय असून, ते  कसे करावे त्याची ही माहिती.

समजून घेणे महत्वाचे  : गुडघे दुखत असतील तर अगोदर ते कशामुळे दुखतात हे जाणू घ्या. शस्त्रक्रिया करण्यासारखा त्रास असेल तर घरगुती उपाय करु नका. त्यामुळे आणखीनच त्रास वाढू शकतो. 
पायांना पट्टी बांधा : छोट्या मोठा मार लागल्याने जर तुमचे गुडघे दुखत असतील तर त्यासाठी घरच्या घरी उपाय के ले जाऊ शकतात. याकरिता पायांना थंडी पट्टी बांधून ठेवावी. 
लिंबू : लिंबाचे लहान लहान तुकडे करुन, ते कॉटनच्या कपड्यात बांधावे. तसेच तिळाचे तेल गरम करुन, लिंबू कपडा त्या तेलात डुबवून, त्रास होणाºया जागेवर ठेवावा. त्यामुळे तुमच्या गुडघ्याला आराम मिळू शकतो. 
मोहरीचे तेल : मोहरीचे तेल गरम करुन, त्यामध्ये लसणाची एक पाकळी टाकू न त्याला शिजवावे. त्या तेलाला त्रास होणाºया जागेवर लावावे. त्यानंतरला प्लॉस्टीकने त्या जागेला बांधावे. ही प्रक्रिया दोन ते तीन आठवडे करणे आवश्यक आहे.
मीठ : गरम पाण्यात मीठ टाकू न, १५ मिनीटे पाय पाण्यात डुबवून ठेवावा. जोपर्यंत आराम मिळत नाही,तोपर्यंत ही प्रक्रिया करीत राहावी. 
युकिलिप्टस तेल: गुडघे दुखण्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी युकिलिप्टस तेल हा सुद्धा रामबाण उपाय आहे

Web Title: Want to get rid of knee jerk?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.