कंडीशनरचा चुकीचा वापर केसांसोबतच त्वचेसाठीही हानिकारक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 10:24 IST2018-07-19T10:22:45+5:302018-07-19T10:24:00+5:30
केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण बऱ्याचदा शॅम्पू आणि कंडीशनरचा रोज वापर करतो. हे प्रोडक्टस केसांना मुलायम आणि चमकदार बनवण्याचे काम करतात.

कंडीशनरचा चुकीचा वापर केसांसोबतच त्वचेसाठीही हानिकारक!
केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण बऱ्याचदा शॅम्पू आणि कंडीशनरचा रोज वापर करतो. हे प्रोडक्टस केसांना मुलायम आणि चमकदार बनवण्याचे काम करतात. पण हेच कंडीशनर चुकीच्या पद्धतीने वापरलं तर त्याचे गंभीर परिणाम केसांसोबतच त्वचेवरही होतात. जाणून घेऊयात कंडीशनरचा चुकीच्या पद्धतीनं वापर करणं किती घातक ठरू शकतं...
रूक्ष आणि निर्जीव केसांना काही मिनिटांमध्ये मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी कंडीशनर आणि शॅम्पूसारख्या प्रोडक्टसचा वापर करण्यात येतो. यामध्ये अनेक केमिकल्सचा वापर करण्यात आलेला असतो. जर तुम्ही यांचा अधिक वापर केलात तर त्यामुळे केसांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक शॅम्पू आणि कंडीशनरमध्ये कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरणारे कोकामाइड डाईइथेनोलामाइन हे केमिकल असते. त्यामुळे याच्या वापरामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.
त्वचेवरही होतात गंभीर परिणाम
बऱ्याच लोकांना कंडीशनर वापरण्याचा योग्य मार्ग माहीत नसतो. त्यामुळे केस धुताना कंडीशनर त्यांच्या त्वचेवर आणि टाळूवरही लागते. कंडीशनर तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले केमिकल्स शरीरासाठी अत्यंत घातक असून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देतात. त्यामुळे कंडीशनरचा वापर करताना सावधानता बाळगा.
गरोदरपणात याचा वापर टाळा
केमिकलयुक्त क्लिंजींग प्रोडक्टस आणि ब्युटी प्रोडक्टसचा अति वापर गरोदर स्त्रियांसाठी हानिकारक ठरू शकतो. केमिकलयुक्त प्रोडक्ट्समुळे बाळाच्या जन्मावेळी त्यांना अनेक समस्या होऊ शकतात. बाळाला जन्म देताना मेंदू आणि पाठीच्या मणक्याला इजा पोहचण्याचा धोका संभवतो.
केसांच्या प्रकारानुसार वेगवेगळे कंडीशनर
केसांचेही वेगवेगळे प्रकार आढळून येतात. त्यामुळे प्रत्येक केसांसाठी एकच कंडीशनर असत नाही. जर तुमचे केस ऑयली आहेत, तर तुम्ही ड्राय केसांसाठी असलेलं कंडीशनर वापरू शकत नाहीत. त्यामुळे केसांना नुकसान पोहोचते. त्यामुळे तुमच्या केसांनुसार त्यासाठी योग्य त्या शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर करा.
शॅम्पू आणि कंडीशनरचा असा करा वापर
बाजारामध्ये शॅम्पू आणि कंडीशनर अनेक प्रकारचे असतात. मॉइस्चराइजिंग, स्मूथनिंग इत्यादी. केसांची कोणतीही समस्या असेल तरिही तुम्ही दोन्ही एकाच ब्रँडचे असणे गरजेचे आहे. जर तुमच्या टाळूची त्वचा ड्राय आणि केसांचा पोत चांगला असेल तर त्यासाठी मॉइस्चराइजिंग शॅम्पू हा उत्तम पर्याय आहे. पण मॉइस्चराइजिंग शॅम्पू आणि कंडीशनर दोन्हींचा वापर केल्यामुळे केसांचे आरोग्य बिघडू शकते. तुम्ही शॅम्पूची निवड तुमच्या टाळूची त्वचा, केसांचा प्रकार, केमिकल ट्रीटमेंट यांनुसार करावी.