जिममध्ये मेकअप लावून एक्सरसाइज करण्याची असेल सवय तर वेळीच बदला, नाही तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 11:21 IST2019-10-29T11:13:46+5:302019-10-29T11:21:40+5:30
तुम्ही हलकं-फुलकी कार्डिओ एक्सरसाइज करत असाल वा हेवी वर्कआउट यावेळी चेहऱ्यावर मेकअप असणे तुमच्या त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतं.

जिममध्ये मेकअप लावून एक्सरसाइज करण्याची असेल सवय तर वेळीच बदला, नाही तर...
(Image Credit : stylecaster.com)
अनेक महिला जिमला जाण्याआधी मेकअप करतात. पण या महिलांना लगेच त्यांची ही सवय बदलली पाहिजे. तुम्ही हलकं-फुलकी कार्डिओ एक्सरसाइज करत असाल वा हेवी वर्कआउट यावेळी चेहऱ्यावर मेकअप असणे तुमच्या त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतं. कोणत्याही प्रकारचा वर्कआउट करण्यादरम्यान चेहऱ्यावर मेकअप लावलेलं असणं योग्य नाही. याची काही कारणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
इन्फेक्शनचा धोका
एक्सरसाइज करताना भरपूर प्रमाणात घाम जातो. अशात जर तुम्ही एक्सरसाइज करताना तुमच्या चेहऱ्यावर मेकअप लावून ठेवाल तर बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता वाढते. कारण मेकअप बॅक्टेरियाला आकर्षित करतं. शरीरातून विषारी तत्व बाहेर काढण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे एक्सरसाइज आणि मेकअप लावून तुम्ही विषारी तत्व बाहेर येण्यापासून तुम्ही रोखत आहात.
स्किनचे पोर्स होतील मोठे
क्लॉग्ड पोर्स म्हणजेच त्वचेची रोमछिद्रे जेव्हा बंद होतात आणि एक्नेची समस्या होते. तेव्हा यावर उपाय केला जातो, पण रोमछिद्रे मोठी झाली तर याने त्वचेचं नेहमीसाठी नुकसान होऊ शकतं. वर्कआउट करतेवेळी त्वेचची रोमछिद्रे मोकळी होतात, पण जर ते मोकळे झाले नाही तर ते कालांतराने मोठे होतात, ज्याने त्वचेचं नुकसान होतं.
स्किन इरिटेशन
जर तुमची त्वचा फार जास्त संवेदनशील किंवा नाजूक असेल तर तुम्ही एक्सरसाइज करण्याआधी मेकअप करणं फारच चुकीचं ठरेल. याने तुमच्या त्वचेवर लाल चट्टे, असमान रंग आणि इरिटेशन म्हणजे खाज किंवा जळजळ होण्याची समस्या होऊ शकते.
सवय बदलू शकत नसाल प्रॉडक्ट बदला
जर तुम्हाला जिमला मेकअप करून जाण्याची सवयच असेल आणि ही सवय तुम्ही बदलू शकत नसाल तर निदान मेकअप प्रॉडक्ट बदला. नॉन-कोमेडोजेनिक प्रॉडक्टस् वापरा. याने तुमच्या त्वचेची रोमछिद्रे बंद होणार नाहीत. हेवी ऑइल बेस्ड मेकअप प्रॉडक्ट्सऐवजी हलक्या प्रॉडक्ट्सचा वापर करा.