पुरुषांमधील वंध्यत्वावर मात करण्यासाठी आक्रोड उपयोगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:25 IST2016-01-16T01:11:54+5:302016-02-05T08:25:34+5:30
पुरुषांमधील वंध्यत्वावर मात करण्यासाठी रोज अक्रोडचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

पुरुषांमधील वंध्यत्वावर मात करण्यासाठी आक्रोड उपयोगी
ुरुषांमधील वंध्यत्वावर मात करण्यासाठी रोज अक्रोडचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे, असे संशोधकांचे मत आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचे शुक्राणू तयार होतात. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या लॉस एंजल्स स्कूल ऑफ नर्सिगच्या संशोधिका वेंडी रॉबिन्स यांनी हे संशोधन केले आहे. दररोज 75 ग्रॅम अक्रोड सेवन केले तर शुक्राणूंची हालचाल सुधारते आणि सक्षमताही वाढते. 21 ते 35 वयोगटातील पुरुषांमध्ये हा परिणाम दिसून आला. बायोलॉजी ऑफ रिप्रॉडक्शन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.