त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी 'या' घरगुती ब्लीचचा वापर करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 18:17 IST2018-08-18T18:15:11+5:302018-08-18T18:17:14+5:30
अनेकदा त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन काही ट्रिटमेंट करण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने एक ट्रिटमेंट करण्यात येते ती म्हणजे ब्लीच करणं.

त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी 'या' घरगुती ब्लीचचा वापर करा!
अनेकदा त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन काही ट्रिटमेंट करण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने एक ट्रिटमेंट करण्यात येते ती म्हणजे ब्लीच करणं. ब्लीच केल्यानं चेहऱ्यावरील मृत पेशी आणि घाण निघून जाते. तसेच चेहऱ्याची त्वचा तजेलदार आणि उजळलेली दिसते. मार्केटमध्ये मिळणाऱ्या आणि पार्लरमध्ये वापरण्यात येणाऱ्या ब्लीचमध्ये भरपूर प्रमाणात केमिकल्स आढळून येतात. यामुळे त्वचेला इजा पोहचते. तसेच अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
1. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात ब्लीचिंग प्रॉपर्टीज असतात. ज्या त्वचा उजळवण्यासाठी फायदेशीर ठरतात. याचा वापर करण्यासाठी एका कच्च्या बटाट्याची साल काढून तो किसून घ्या. त्यानंतर त्यामध्ये थोडं गुलाबजल आणि मध मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून 3 वेळा याचा वापर केल्याने त्वचा उजळण्यास मदत होते.
2. टॉमेटोमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. जे त्वचा उजळवण्यासाठी फायदेशीर असतात. याचा वापर करण्यासाठी टॉमेटो मध्यभागी कापा त्याच्या अर्ध्या भागावर हळद लावून चेहऱ्यावर मसाज करा. 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका.
3. काकडी त्वचेसाठी फायदेशीर असते. काकडीमध्ये मुबलक प्रमाणावर व्हिटॅमिन सी आढळतं. त्यामुळे काकडीच्या मदतीने त्वचेला ब्लीच करता येतं. त्यासाठी एक काकडी किसून त्याच्या रस काढून घ्या. त्यानंतर त्यामध्ये थोडा लिंबाचा रस आणि अॅलोवेरा जेल टाकून चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनंतर पाण्याने धुवून टाका.
टिप : वरील उपायांचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.