पुदिना वापरा, सौंदर्य खुलवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 15:09 IST2017-01-03T15:08:20+5:302017-01-03T15:09:41+5:30

खमंग भजी, पराठे, चटणी तसेच नॉन व्हेज आदी खाद्यपदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी पुदिन्याचा आवर्जून वापर केला जातो. शिवाय पुदिन्याचे अनेक औषधी गुणधर्म असून, बहुतांश रोगांवर त्याचा उपयोग केला जातो.

Use the mint, open the beauty! | पुदिना वापरा, सौंदर्य खुलवा !

पुदिना वापरा, सौंदर्य खुलवा !

ंग भजी, पराठे, चटणी तसेच नॉन व्हेज आदी खाद्यपदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी पुदिन्याचा आवर्जून वापर केला जातो. शिवाय पुदिन्याचे अनेक औषधी गुणधर्म असून, बहुतांश रोगांवर त्याचा उपयोग केला जातो. डोके अथवा पोटात दुखत असल्यास पुदिन्याची पाने चघळल्यास आराम मिळतो. अचानक लागलेली उचकी देखील पुदिन्याची पान खाल्ल्याने थांबते. याव्यतिरिक्त पुदिन्याचा वापर सौंदर्य खुलविण्यासाठीही केला जाऊ लागला आहे. 



पुदिन्याने असे खुलवा सौंदर्य
आॅयली त्वचेच्या समस्येवर पुदिना फेशियल करुन सुटका मिळवू शकता. यासाठी दोन मोठे चमचे ताजी वाटलेली पुदिन्याची पाने, दोन मोठे चमचे दही आणि एक मोठा चमचा ओटमील एकत्र करुन याची पेस्ट बनवावी. ही पेस्ट दहा मिनिटे चेहऱ्याला लावून नंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. यामुळे लगेच फरक जाणवून चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंम्पल्सही कमी होण्यास मदत होते. पुदिन्याच्या रसात मुल्तानी माती मिसळून चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्यादेखील कमी होतात आणि चेहरा चमकतो. एखाद्या जखमेवर पुदिन्याचा रस लावल्यास घाव लवकर भरुन येतो. त्वचा रोगावर देखील पुदिन्याचा रस उपयुक्त आहे. पुदिन्याच्या सुकलेल्या पानांपासून तयार केलेल्या पावडरचा दंत मंजन प्रमाणे वापर केला जाऊ शकतो. यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि हिरड्या मजबूत होतात. पुदिन्याची पाने, ताजा लिंबाचा रस आणि मध यांचे समान मिश्रण घेवून एकत्र सेवन केल्यास पोटाशी संबधित विकारांपासून आराम मिळतो.  

 

Web Title: Use the mint, open the beauty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.