पावसाळ्यात त्वचेची खास काळजी घेण्याची गरज असते. त्यामुळे फेसपॅकचा नियमित वापर करावा. तसे तर बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे फेस पॅक आणि मास्क उपलब्ध असतात, पण त्यात केमिकल्स असल्याने त्वचेचं नुकसान होण्याचा धोका अधिक असतो. अशात जर त्वचेचं नुकसान होणं वाचवायचं असेल आणि त्वचा चमकदार करायची असेल तर नैसर्गिक उपाय करावा. तुम्ही मिल्क पावडरपासून तयार फेसपॅकचा वापर करू शकता.

आपणा सर्वांनाच हे माहीत आहे की, मुलतानी माती त्वचेसाठी किती फायदेशीर असते. खासकरून ऑयली त्वचा असलेल्यांसाठी तर मुलतानी माती वरदान मानली जाते. मुलतानी माती आणि मिल्क पावडर समान प्रमाणात घेऊन पेस्ट तयार करा. यात तुम्ही थोडं गुलाबजलही टाकू शकता. चेहऱ्यावर लावल्यानंतर काही वेळाने चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करावा.

(Image Credit : www.pinterest.co.uk)

जर तुमची त्वचा निर्जीव झाली असेल आणि तुम्हाला त्यात तजेलदारपणा हवा असेल तर एक चमचा मिल्क पावडरमध्ये दोन चमचे लिंबाचा रस टाका. ही पेस्ट आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर लावा. पेस्ट कोरडी झाल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. हा फेसपॅक नियमित वापराल तर काही दिवसातच फरक बघायला मिळेल.

(Image Credit : www.howtoxp.com)

तसेच चेहऱ्यावरील पिंपल्सने तुम्ही हैराण असाल तर तुम्ही ही समस्या मिल्क पावडरने दूर करू शकता. मिल्क पावडरमध्ये  मध आणि गुलाबजलचे काही थेंब टाका. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा लावा. चेहऱ्यावर लावल्यावर १५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. काही दिवसांनी तुम्हाला फरक बघायला मिळेल.

जर तुमच्याकडे केशर असेल तर ते मिल्क पावडरमध्ये मिश्रित करून पेस्ट तयार करा. आधी चेहरा चांगला स्वच्छ करा आणि पेस्ट लावा. काही वेळाने चेहऱ्या पाण्याने धुवावा. काही दिवसांनी तुम्हाला फरक बघायला मिळेल.


Web Title: Use milk powder face pack for glowing skin
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.