Under arms shaving tips for teen girls | पहिल्यांदाच रेजरचा वापर करणाऱ्या टीनएजर्सनी टाळाव्या 'या' चुका, जाणून घ्या योग्य पद्धत....
पहिल्यांदाच रेजरचा वापर करणाऱ्या टीनएजर्सनी टाळाव्या 'या' चुका, जाणून घ्या योग्य पद्धत....

तारूण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मुलींमध्ये हार्मोनल बदलांमुले शरीरात वेगवेगळे बदल होऊ लागतात. यामुळे त्यांना सुरूवातीला थोडा त्रासही होतो. ज्यातील सर्वात कॉमन समस्या असते ती शरीरावर नको असलेले केस. टीनएजर्स मुली अनेकदा या नको असलेल्या अतिरिक्त केसांना हैराण होऊन घरीच रेजरचा वापर करू लागतात. कारण यांचा वापर करणं सोपं आणि स्वस्त असतो.

पण अनेकदा पहिल्यांदा रेजरचा वापर करताना काय काळजी घ्यावी हे मुलींना माहीत नसतं. त्यामुळे त्या चुकीच्या पद्धतीने शेव्ह करतात. या चुकांमुळे अंडरआर्म्सची त्वचा काळी पडते आणि केसही रफ होतात. जर तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला पहिल्यांदाच रेजरचा वापर करत असतील तर याची योग्य पद्धत जाणून घ्यावी.

काय आहे योग्य पद्धत?

ब्युटी एक्सपर्ट्स अंडरआर्म्सचे केस काढण्यासाठी रेजरऐवजी वॅक्सिंगलाच चांगला पर्याय मानतात. पण अनेक मुली ब्युटी पार्लरच्या फंद्यात न पडता रेजरचा वापर करणं अधिक पसंत करतात. अशात तुम्हीही असं करत असाल तर काही खालील टिप्स ध्यानात ठेवा.

१) मल्टी ब्लेड रेजरचा वापर करणं टाळा. अशा रेजरमुळे त्वचेला चिकटून असलेले केसही कापले जातात, ज्यामुळे त्वचेच्या आत इनग्रोन हेअर येण्याचा धोका अनेक पटीने वाढतो.

२) धार खराब झालेलं रेजर अजिबात वापरू नका. क्लीन आणि चांगलं शेव्हिंग हवं असेल तर शार्प रेजर किंवा इलेक्ट्रिक ट्रिमर वापरा. जर तुम्हाला वाटत असेल की, रेजर त्वचेवर व्यवस्थित चालत नाहीये, तर वेळीच रेजर बदलण्याचा हा संकेत आहे.

३) अंडरआर्म्स शेव्ह करण्याआधी त्या भागात गरम पाणी लावा. २ ते ३ मिनिटे वाट बघा. जेव्हा केस पूर्णपणे भिजतील तेव्हा शेव्हिंग करा.

४) कोणत्याही प्रकारचं इरिटेशन टाळायचं असेल तर तुम्ही अंडरआर्म्स शेव्हिंग जेलचा वापर करू शकता. 

५) अंडरआर्म्सचे केस कोणत्याही दिशेने वाढतात. अशात रेजर प्रत्येक डायरेक्शनमध्ये फिरवून शेव्हिंग करा. 

६) अंडरआर्म्स शेव्हिंग करताना एखादं क्रीम किंवा ऑइल लावा. ज्यामुळे त्वचेवर ओलावा कायम राहतो.  

Web Title: Under arms shaving tips for teen girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.