आतड्याच्या कॅन्सरसाठी हळद अत्यंत लाभदायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 22:05 IST2016-07-23T16:35:04+5:302016-07-23T22:05:04+5:30
हळदीमध्ये असणाऱ्या विशिष्ट संयुगांमुळे कोलन कॅन्सरवर ती लाभदायक असते, असे संशोधकांच्या एका चमूला आढळले.

आतड्याच्या कॅन्सरसाठी हळद अत्यंत लाभदायक
म ठ्या आतड्याच्या कॅन्सरचा (कोलन कॅन्सर) धोका कमी करण्यासाठी व त्यावर इलाज म्हणूनही हळद अत्यंत गुणकारी असते. हळदीमध्ये असणाऱ्या विशिष्ट संयुगांमुळे कोलन कॅन्सरवर ती लाभदायक असते, असे संशोधकांच्या एका चमूला आढळले.
जीवनशैलीतील आरोग्यास घातक सवयी (चुकीचा किंवा पोषणरहित आहार) अशा प्रकारच्या कॅन्सरला कारणीभूत असतात.
हळदीमध्ये असणाऱ्या ‘करक्युमिन’ आणि मिल्क थिसलमध्ये असणारे ‘सिलिमरिन’ संयुगामध्ये वैद्यकीय गुणधर्म असतात. त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे कोलन कॅन्सरच्या उपचारांमध्ये त्यांचा फायदा होतो. सेंट लुई विद्यापीठातील सहप्राध्यापक उदयशंकर इझकाईल यांनी माहिती दिली की, कॅन्सर उपचारांमध्ये फायटोकेमिकल्सचा वापर करून केमोथेरपीला एक पयार्यी ट्रीटमेंट निर्माण केली जाऊ शकते. कारण यामध्ये केमोथेरपीमध्ये असणारे दूष्परिणाम टाळले जाऊ शकतात.
कोलन कॅन्सर पेशींचा प्रयोगशालेय मॉडेलमध्ये संशोधकांनी अभ्यास केला. त्यावेळी असे दिसून आले की, कॅन्सरपेशींचा आधी करक्युमिनद्वारे इलाज क रून नंतर सिलिमरिनद्वारे उपचार करणे अधिक प्रभावशाली ठरते. या दोन्ही प्रकारच्या संयुगाचा असा वापर केला असता कोलन कॅन्सरच्या पेशींची वाढ कमी होऊन त्याचे प्रसरण थांबते. तसेच कॅन्सरपेशींदेखील नष्ट होतात.