(Image Credit : Women's Health)

चेहऱ्यावरील नको असलेले केस म्हणजे, अनेक महिलांसाठी डोकेदुखीच. अनेकदा हे केस दूर करण्यासाठी महागड्या पार्लर ट्रिटमेंट्स किंवा डॉक्टरांची मदत घेतली जाते. एवढचं नाही तर बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा आधारही घेण्यात येतो. अनेक उपाय केल्यानंतरही हे केस लगेचच पुन्हा उगवतात आणि यावर उपाय करण्यासाठी लागणारा खर्च अनेकदा डोईजड होतो. अशावेळी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. मग का नाही खर्चिक उपाय करण्याऐवजी घरच्या घरीच उपाय करण्यात यावे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील केसांची समस्या दूर करण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय करण्यासाठी तुमच्याकडे फक्त बेसन आणि हळद असणं आवश्यक आहे. 

कसा कराल बेसन आणि हळदीचा फेस पॅक? 

बेसन आणि हळदीचा फेस पॅक तयार करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा...

 • एका बाउलमध्ये दोन चमचे बेसन घ्या 
 • बेसनामध्ये अर्धा चमचा हळद एकत्र करा
 • यामध्ये तुम्ही दूध, गुलाब पाणी किंवा फक्त पाणी एकत्र करून पेस्ट तयार करू शकता. 
 • सर्व गोष्टी व्यवस्थित एकत्र करून पेस्ट तयार करा.
 • तयार मिश्रण ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. 
 • 15 ते 20 मिनिटं ठेवल्यानंतर चेहऱ्यावर स्क्रब करा आणि हलक्या गरम पाण्याने चेहरा स्वच्छ करा. 
 • थंड पाणी किंवा बर्फाने चेहऱ्यावर मसाज करा, यामुळे चेहऱ्यावरील पोर्स बंद होण्यास मदत होते. 

 

'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा : 

 • बेसन आणि हळद एकत्र करून पेस्ट तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी हळद मसाल्याच्या डब्यातून घेऊ नका. त्यामुळे त्वचेवर जळजळ होण्याची शक्यता असते. 
 • एकत्र केल्यानंतर थोडीशीही जळजळ झाली तर चेहरा लगेच पाण्याने धुवून टाका. 
 • हळद कमी टाका, नाहीतर चेहऱ्यावर पिवळटपणा दिसू लागेल. 
 • हलक्या हातांनी स्क्रब करा नाहीतर चेहऱ्यावर पूरळ येण्याची समस्या होऊ शकते. 
 • बेसन आणि हळदीचा फेस पॅक आठवड्यातून दोन वेळा वापरा. दररोज वापर करणं टाळा. 

 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Turmeric or haladi and gram flour or besan to remove facial hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.