हिवाळ्यात अजिबात कोरडी होणार नाही त्वचा; फक्त 'या' 4 गोष्टींची घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 01:17 PM2019-11-01T13:17:31+5:302019-11-01T13:17:44+5:30

वातावरण बदलत असून हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. हिवाळा सुरू होताच त्वचा कोरडी होऊ लागते. जसं उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे अगदी हैराण व्हायला होतं, त्याचप्रमाणे थंडीत ड्राय स्किनमुळे अगदी नकोसं वाटतं.

Try these tips to avoid skin dryness in winters | हिवाळ्यात अजिबात कोरडी होणार नाही त्वचा; फक्त 'या' 4 गोष्टींची घ्या काळजी

हिवाळ्यात अजिबात कोरडी होणार नाही त्वचा; फक्त 'या' 4 गोष्टींची घ्या काळजी

googlenewsNext

वातावरण बदलत असून हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. हिवाळा सुरू होताच त्वचा कोरडी होऊ लागते. जसं उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे अगदी हैराण व्हायला होतं, त्याचप्रमाणे थंडीत ड्राय स्किनमुळे अगदी नकोसं वाटतं. यावर उपाय म्हणून अनेक गोष्टी केल्या जातात. पण काहीच उपयोग होत नाही. अशातच आज आम्ही काही हटके गोष्टी सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने थंडीमध्ये ड्राय स्किनपासून सुटका करणं सहज शक्य होतं. 

का होते ड्राय स्किनची समस्या? 

हिवाळ्यात वाहणाऱ्या शुष्क हवांमुळे त्वचेतील ओलावा नष्ट होतो. खरंतर थंडीत वातावरणातील ओलावा कमी होतो. ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी आणि ड्राय होते. पण शक्य असेल तर हिवाळ्यात उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्यांपासून अगदी सहज सुटका करून घेणं शक्य असतं. जाणून घेऊया यासाठी काही उपाय... 

दूधाचा वापर 

त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी दूध एक उत्तम उपाय आहे. अशातच दररोज चेहऱ्यावर दूध लावा. कापसाच्या मदतीने दूध लावल्यानंतर 15 मिनिटांनी हलक्या कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. 

ऑलिव्ह ऑइल 

ऑलिव्ह ऑइल थंडीमध्ये तुमची त्वचा मुलायम ठेवण्यास मदत करतं. आंघोळीच्या एक तास अगोदर संपूर्ण शरीरावर ऑलिव्ह ऑइलच्या मदतीने मसाज करा. 

मॉयश्चरायझर लावा 

ज्या महिलांची त्वचा जास्त ड्राय होते. त्यांनी आंघोळ केल्यानंतर लगेच आणि रात्री झोपण्यापूर्वी दोन वेळा मॉयश्चरायझर लावावं. 

भरपूर पाणी प्या 

थंडीमध्ये जास्त तहान लागत नाही, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता असते. अशातच त्वचा ड्राय होते. दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. 

यासर्व गोष्टींव्यतिरिक्त एक खास फेसपॅकच्या मदतीने तुम्ही त्वचेचा कोरडेपणा दूर करू शकता. हा फेसपॅक पुदिन्याच्या पानांपासून तयार केला जातो. जाणून घेऊया पुदिन्याचा फेस पॅक तयार करण्याची पद्धत... 

पुदिन्याचा फेसपॅक : 

पुदिन्याची पानं त्वचेसाठी एक्सफोलिएटर प्रमाणे काम करतात. या पांनाचा रस काढून चेहऱ्यावर लावा किंवा एक चमचा ओटमीलमध्ये एकत्र करून चेहऱ्यावर लावा. जेव्हा फेसपॅक सुकतो त्यावेळी स्क्रब करून चेहऱ्यावरून रिमूव्ह करतात. यामुळे चेहऱ्यावरील डेड सेल्स आणि डेलनेस रिमूव्ह होतात. 

पुदिन्याचं टोनर 

तुम्ही शक्य असल्यास पुदिन्याचा वापर टोनरच्या रूपातही करू शकता. अनेक महिला दररोज चेहऱ्यावर टोनरचा वापर करतात. बाजारामध्ये मिळणाऱ्या टोनरचा वापर करून चेहरा स्वच्छ केल्याने चेहऱ्याचा रंग फिका पडतो. अशातच पुदिन्याची पानं उकळून त्याचं पाणी गाळून घ्या. थंड झाल्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. आठवड्यातून 2 वेळा होममेड टोनरसोबत चेहरा स्वच्छ करा. काही दिवसांतच तुमचा चेहरा फ्रेश आणि ग्लोइंग दिसू लागेल. 

चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेण्यासोबतच शरीर आतून निरोगी ठेवणं तितकचं आवश्यक आहे. अशातच आपल्या आहारावरही लक्ष द्या. जाणून घेऊया आहारातील कोणते पदार्थ ठरतात फायदेशीर?

गाजर

व्हिटॅमिन-सी आणि ए मुबलक प्रमाणात असलेलं गाजर त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दररोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने किंवा सलाड खाल्याने शरीराला अनेक फायदे होतात. गाजर तुमच्या शरीरामध्ये कोलेजन तयार करतात. ज्यांच्या मदतीने थंडीत तुमची ड्राय स्किनपासून सुटका होते. 

बीट 

बीट तुमच्यासाठी लिव्हर डिटॉक्स करण्याचं काम करतं. ज्यामुळे रक्त शुद्ध होण्यासही मदत होते. रक्त जेवढं स्वच्छ असेल तेवढ्या त्वचेशी निगडीत समस्या दूर होण्यास मदत होते.

हिरव्या पालेभाज्या 

हिरव्या पालेभाज्या म्हणजेच, मेथी, पालक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. ज्यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो. तसेच कोरड्या त्वचेची समस्याही दूर होते. 

ब्रोकली

ब्रोकली खाल्याने तुमची स्किन हेल्दी राहते. तसेच तुम्ही सलाड किंवा सूपचाही आपल्या डाएटमध्ये समावेश करू शकता. 

फळं 

थंडीमध्ये मिलणारी सर्व फळं त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. संत्री, पपई, द्राक्षं आणि सफरचंद खाल्याने त्वचेचे पोर्स ओपन होतात. ज्यामुळे त्वचा श्वास घेऊ शकते. तसेच त्वचेचा कोरडेपणा दूर होतो.

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: Try these tips to avoid skin dryness in winters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.