उन्हाळ्यात सनस्क्रीनपेक्षा कमी नाही टोमॅटोचे हे फेसपॅक, जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 12:40 IST2019-04-03T12:40:14+5:302019-04-03T12:40:52+5:30

टोमॅटोमध्ये असलेल्या लायकोपीन तत्वामुळे त्वचेला वेगवेगळे फायदे होतात. खासरून उन्हाळ्यात टोमॅटोचे वेगवेगळे फेसपॅक वापरून तुम्ही त्वचेची योग्य ती काळजी घेऊ शकता.

Tomatoes natural sunblock your skin, know hot to use | उन्हाळ्यात सनस्क्रीनपेक्षा कमी नाही टोमॅटोचे हे फेसपॅक, जाणून घ्या फायदे

उन्हाळ्यात सनस्क्रीनपेक्षा कमी नाही टोमॅटोचे हे फेसपॅक, जाणून घ्या फायदे

बालपणापासून आपण टोमॅटो खाण्याचे वेगवेगळे फायदे ऐकलेले असतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, टोमॅटोने त्वचेचं सौंदर्यही वाढवलं जाऊ शकतं. टोमॅटोमध्ये असलेल्या लायकोपीन तत्वामुळे त्वचेला वेगवेगळे फायदे होतात. खासरून उन्हाळ्यात टोमॅटोचे वेगवेगळे फेसपॅक वापरून तुम्ही त्वचेची योग्य ती काळजी घेऊ शकता. बाजारातील केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा उन्हाळ्यात हे नैसर्गिक आणि घरगुती उपाय केल्यास अधिक फायदा होईल.

पिकलेल्या टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळे तत्त्व आढळतात. तज्ज्ञ सांगतात की, टोमॅटो खाल्ल्याने त्वचेचा सूर्याच्या प्रखर किरणांपासून बचाव होतो. टोमॅटोच्या फेसपॅक ना केवळ सनप्रोटेक्शन होत तर त्यातील ल्यूटिन चेहऱ्याला हायड्रेट ठेवण्यासही मदत करतं. 

टोमॅटो आणि लिंबू

(Image Credit : makeupandbeauty.com)

टॅनिन दूर करण्यासाठी टोमॅटोचा गर लिंबाच्या रसात मिश्रित करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडं झाल्यावर चेहरा पाण्याचे धुाव. याचा उन्हाळ्यात रोज वापर केल्याने त्वचेवरील टॅनिंग दूर होईल. तसेच त्वचेवर एक वेगळाच ग्लो येईल.

टोमॅटो, दही आणि लिंबू

टोमॅटो, दही आणि लिंबाचा रस त्वचेवर नैसर्गिक ब्लीचच्या रूपात काम करतो. याने त्वचेवरील रोमछिद्रे स्वच्छ केली जातात आणि अतिरिक्त तेलही दूर केलं जातं. लिंबू ब्लीच आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल तत्वासारखं काम करतं. तर दह्याने त्वचेला ओलावा मिळतो, ज्यामुळे त्वचेचा रखरखीतपणा दूर होतो. 

टोमॅटो आणि साखर

(Image Credit : Project Vanity)

टोमॅटोच्या तुकड्यावर साखर टाकून स्क्रबसारखं चेहऱ्यावर लावा. याने पिंपल्स आणि डाग दूर होण्यास मदत मिळेल. १० मिनिटांची चेहरा धुवा. त्यानंतर मध टोमॅटोसोबत मिश्रित करून चेहऱ्यावर लावा. याने त्वचा साफ होईल.

टोमॅटो, मध आणि बेसन

चेहरा चमकदार आणि मुलायम करण्यासाठी हा फेसपॅक फायदेशीर ठरतो. टोमॅटो, मध, बेसन आणि पुदीन्याच्या पानांची पेस्ट तयार करा. त्यात तुम्ही काकडीही टाकू शकता. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि काही मिनिटांनी चेहरा धुवा. 

Web Title: Tomatoes natural sunblock your skin, know hot to use