शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका
2
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
5
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
6
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
7
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
8
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
9
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
10
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
11
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
12
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
13
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
14
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
15
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
16
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
17
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
18
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
19
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
20
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...

मान्सूनमध्ये पिंपल्स आणि अ‍ॅक्ने दूर करण्यासाठी वापरा 'या' घरगुती टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 16:56 IST

पावसाळ्यात त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या वातावरणात सूर्याच्या प्रखर किरणांपासून सुटका होते पण वातावरणातील ओलाव्यामुळे बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्यांसोबतच त्वचा आणि केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

(Image Credit : Hennig Arzneimittel)

पावसाळ्यात त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या वातावरणात सूर्याच्या प्रखर किरणांपासून सुटका होते पण वातावरणातील ओलाव्यामुळे बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्यांसोबतच त्वचा आणि केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच चेहऱ्यावर पिंपल्स आणि पूरळ येतात आणि जाता-जाता डाग ठेवून जातात. त्यामुळे मान्सूनमध्ये आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेणं फायदेशीर ठरतं. तसं तर अ‍ॅक्ने आणि पिंपल्स कोणत्याही वातावरणात येऊ शकतात. त्यामुळे या समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही या सर्व समस्या दूर करू शकता. 

1. सर्वात आधी जंक फूड खाणं टाळा. तसेच जास्त तळलेले, मसालेदार पदार्थ खाल्याने त्वचा तेलकट होते. परिणामी पिपल्सची समस्या वाढते. 

2. दररोज कमीत कमी 3 लीटर पाणी प्या. याशिवाय कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस एकत्र करून प्यायल्यानेही त्वचेला फायदा होतो. पाण्याव्यतिरिक्त सलाड, फळं, भाज्या, मोड आलेली कडधान्य आणि दही मुबलक प्रमाणात खा. 

(Image Credit : Today Show)

3. जर त्वचा ऑयली असेल तर सर्वात आधी स्किन क्लीनिंग करा आणि त्यानंतर एस्ट्रिंजेंट ऑइल लावा. एस्ट्रिंजेंट त्वचेवरील घाण स्वच्छ होण्यास मदत होते. 

4. वाफ घेतल्याने पिंपल्स दूर होतात. वाफेमुळे त्वचेची डिप पोर्स ओपन होतात आणि त्यांच्यातील घाण आणि विषारी तत्व निघून जातात. यामुळे पिंपल्स दूर होण्यासोबतच त्वचाही निरोगी होते. 

5. कमीत कमी मेकअप करा, कारण मेकअप प्रोडक्ट्स त्वचेचे ओपन पोर्स बंद करतात आणि यामुळे अॅक्ने आणि ब्रेकआउट होऊ शकतात. जर तुम्ही मेकअप करत असाल तर झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप व्यवस्थित स्वच्छ करून झोपा. 

6. पावसाळ्यामध्ये पिपंल्स दूर करण्यासाठी साखरही अत्यंत उपयोगी ठरते. यासाठी एक चमचा साखरेमध्ये अर्धा चमचा मध आणि काही थेंब लिंबाचा रस एकत्र करून पिंपल्स असणाऱ्या ठिकाणी लावा. तुम्ही हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावरही लावू शकता. अर्धा तास ठेवून साधारणतः स्वच्छ पाण्याने धुवून टाका. अर्ध्या तासाने चेहरा पाण्याने धुवून टाका. लक्षात ठेवा की, हे मिश्रण लावल्यानंतर चेहऱ्यावर साबण किंवा इतर कोणत्याही पदार्थांचा वापर करू नका. 

7. बटाटाही पिंपल्स दूर करण्यासाठी मदत करतं. त्यासाठी तुम्ही बटाट्याचे तुकडे करून पिंपल्स असणाऱ्या ठिकाणी लावू शकता. तसेच बटाट्याचा रसही चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे पिंपल्स दूर होण्यासोबतच त्वचेवरील डागही दूर होतात. टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीMonsoon Specialमानसून स्पेशलBeauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स