काही वेळातच दूर होईल हाता-पायांचा कोरडेपणा; फायदेशीर ठरतील 'हे' घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 13:36 IST2019-10-18T13:34:25+5:302019-10-18T13:36:04+5:30

आपल्या चेहऱ्यासोबतच हाता-पायांची त्वचाही चमकदार आणि उजळलेली असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. एखाद्या पार्टि किंवा फंक्शनमध्ये जाण्याची वेळ येते तेव्हा सर्वात पहिलं लक्षं आपल्या चेहऱ्यासोबतच हात आणि पायांवर जातं.

Tips to get soft and beautiful hand feet | काही वेळातच दूर होईल हाता-पायांचा कोरडेपणा; फायदेशीर ठरतील 'हे' घरगुती उपाय

काही वेळातच दूर होईल हाता-पायांचा कोरडेपणा; फायदेशीर ठरतील 'हे' घरगुती उपाय

आपल्या चेहऱ्यासोबतच हाता-पायांची त्वचाही चमकदार आणि उजळलेली असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. एखाद्या पार्टि किंवा फंक्शनमध्ये जाण्याची वेळ येते तेव्हा सर्वात पहिलं लक्षं आपल्या चेहऱ्यासोबतच हात आणि पायांवर जातं. पण गरजेचं नाही की, फक्त बाहेर जातानाच हात किंवा पायांवर लक्षं द्याव. चेहऱ्याच्या त्वचेप्रमाणेच हात आणि पायांच्या त्वचेचीही काळजी घ्या. 

का होते हाता-पायांची त्वचा ड्राय? 

अनियमित आहारशैली, व्हिटॅमिन-ईची कमतरता, कॅल्शिअम आणि आयर्न मुबलक प्रमाणात न मिळाल्यामुळे तुमचे हात आणि पायांची त्वचा ड्राय होते. अशातच आपल्या डाएटवर लक्ष देणं अत्यंत आवश्यक असतं. प्रोटीनयुक्त आहार आपल्या स्किनला पोषण देतो. अशातच आवश्यक आहे. दररोज दूध, दही आणि इतर प्रोटीनयुक्त पदार्थांचं सेवन करणं. 

सुंदर आणि मुलायम पायांसाठी वापरा हे घरगुती उपाय : 

लिंबू आणि मध 

एका वाटीमध्ये थोडं मध आणि लिंबाचे काही थेंब एकत्र करा. या मिश्रणात ऑलिव्ह ऑइल एकत्र करून आपल्या पायांवर 15 ते 20 मिनिटांसाठी लावा. असं केल्याने पायांची त्वचा स्वच्छ आणि मुलायम दिसून येते. त्यानंतर पाय कोमट पाण्यामध्ये टाकून 5 मिनिटांसाठी तसेच ठेवा. 

हळद, बेसन आणि दही 

दह्यामध्ये हळद आणि बेसन एकत्र करून मिश्रण तयार करा आणि पायांना स्क्रब करा. यामुळे पायांचे डाग हळूहळू दूर होतात. 

ग्लिसरीन आणि ऑलिव्ह ऑइल 

ग्लिसरीन आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करून एका बाटलीमध्ये भरून ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी पायांवर व्यवस्थित मसाज करा. शक्य असल्यास तुम्ही रात्रभर लावून झोपू शकता. असं नियमित केल्याने फायदा होतो. 

कच्चं दूध

कच्च्या दूधाने मालिश केल्याने तुमच्या पायंची त्वचा मुलायम होते. कच्च्या दूधामध्ये थोडं गुलाब पाणी एकत्र करून मालिश केल्याने पायांना येणारी दुर्गंधी दूर होते. कच्चं दूध वापरल्याने पायांची नखं स्वच्छ आणि चमकदार होतात. 

दलिया 

पायांची डेड स्किन काढनू टाकण्यासाठी दलियाची पेस्ट वापरा. त्यासाठी आठवड्यातून एकदा दलिया आणि कच्चं दूध एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पायांवर 5 ते 10 मिनिटांसाठी लावा. 

सुंदर हातांसाठी घरगुती टिप्स... 

ऑलिव्ह ऑइल आणि साखर 

ऑलिव्ह ऑइलचा वापर हातांसाठी एक उत्तम घरगुती उपाय आहे. याचा नियमित वापर केल्याने त्वचा मुलायम होते. हे हातांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी मदत करते. एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये थोडीशी साखर एकत्र करून हातांना मसाज करा. असं तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता. 

गुलाब पाणी, लिंबू आणि ग्लिसरीन 

ग्लिसरीन त्वचा मॉयश्चराइज्ड करण्यासाठी मदत करतं. जर तुमचे हात ड्राय होत असतील तर गुलाब पाणी, लिंबू आणि ग्लिसरीन एकत्र करून दररोज झोपण्यापूर्वी आपल्या हातांना मसाज करा. 

क्रिम आणि बदामाचं तेल 

रात्री झोपण्यापूर्वी हातांना क्रिम लावायला अजिबात विसरू नका. थोड्या मलाईमध्ये बदामाचं तेल एकत्र करून हातांना लावा. यामुळे हातांचा नैसर्गिक रंग परत मिळवण्यासाठी मदत होईल. 

खोबऱ्याच्या तेलाने मालिश करा 

खोबऱ्याच्या तेलामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्वचेच्या इन्फेक्शन झालं असल्यास खोबऱ्याचं तेल फायदेशीर ठरतं. खोबऱ्याचं तेल हातांना लावून मालिश केल्याने हात सुंदर होतात, तसेच त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

 

Web Title: Tips to get soft and beautiful hand feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.