शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे केस ड्राय झाले आहेत का?; 'या' टिप्स करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 18:23 IST

उन्हाळ्यामध्ये त्वचेप्रमाणेच केसांनाही एक्स्ट्रा केअरची गरज असते. तुमचे केस कर्ली, वेवी, स्ट्रट कसेही असोत, उन्हाचा आणि उकाड्याचा यांच्यावर परिणाम होतोच.

उन्हाळ्यामध्ये त्वचेप्रमाणेच केसांनाही एक्स्ट्रा केअरची गरज असते. तुमचे केस कर्ली, वेवी, स्ट्रट कसेही असोत, उन्हाचा आणि उकाड्याचा यांच्यावर परिणाम होतोच. हिटमुळे केस डल, ड्राय आणि डॅमेज होतात. तसेच जास्त वेळ एसीमध्ये राहिल्याने केसांचं मॉयश्चर कमी होतं. उन्हाचा परिणाम केसांवर होऊ नये त्यासाठी काही सोप्य टिप्स...सर्वात आधी उन्हामध्ये केस छोटेच ठेवा. कारण उन्हाळ्यामध्ये घाम, प्रदूषणामुळे केस गळतात. अशातच मोठ्या केसांची काळजी घेणं अवघड होतं. तसेच मोठया केसांमुळे उन्हाचा त्रासही सहन करावा लागतो. 

- जर तुम्हाला छोटे केस करायचे नसतील तर केसांवर हॅट, स्कार्फ बांधूनच घरातून बाहेर पडा. लक्षात ठेवा, स्कार्फ जास्त टाइट बांधू नका आणि सूर्याच्या प्रखर किरणांपासूनही केसांचा बचाव करा. 

- जर तुम्ही स्वीमिंग करत असाल तर पूलमध्ये उतरण्याआधी केस थोडे ओले करा. त्यानंतर त्यावर थोडंसं कंडिशनर लावा. स्वीमिंग करून झाल्यानंतर आंघोळ करताना कंडिशनर काढून टाका. 

- उन्हामध्ये बाहेर निघण्यापूर्वी केसांचा बन बांधा किंवा केस वरती बांधून टाका. त्यामुळए केसांचा उन्हापासून बचाव होतो. उन्हामुळे त्यांना नुकसान होणार नाही.

- जर तुम्हाला जास्त वेळ उन्हामध्ये थांबावं लागणार असेल तर केसांवर सनस्क्रिन लावा. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत शक्यतो घरातून बाहेर पडणं टाळा. घरातून बाहेर पडत असाल तर उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करा. 

- जर उन्हामध्ये बाहेर पडणं गरजेचं असेल तर त्यानंतर सन रिपेअर हेअर मास्क नक्की वापरा. शॅम्पू केल्यानंतर डीप कंडिशनिंगही करा. दही, मायोनिज यांसारखे नॅचरल कंडिशनरचाही वापर करा. 

- उन्हाळ्यामध्ये हेअर ड्रायर आणि कर्लरस वैगरेचा वापर कमीत कमी करा. उन्हाळ्यामध्ये एसीमुळेही केसांचं नॅचरल मॉयश्चरायझर कमी होतं. त्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात प्या आणि केसांसाठी सिरमचा वापर करा. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्सSummer Specialसमर स्पेशल