(Image Credit : iStock)

सुंदर दिसण्यासाठी आकर्षक चेहरा असणं गरजेचं आहे. आकर्षक चेहऱ्यासाठी रेखीव डोळे, नाक, ओठांप्रमाणेच गालंही सुंदर असणंही आवश्यक असतं. Chubby Cheeks म्हणजेच, गोबऱ्या गालांमुळे आपल्या सौंदर्यात आणखी भर पडते. ज्या लोकांचे गाल बसलेले असतात, ते आपल्या डल लूकमुळे वैतागलेले असतात. पण आता हैराण होण्याची गरज नाही. कारण तुमचे गाल सुंदर नसतील तर तुम्ही त्यांना सुंदर बनवू शकता. जाणून घेऊया गोबरे आणि आकर्षक गाल मिळवण्यासठी असलेल्या काही खास टिप्स...

या आहेत खास टिप्स : 

1. मेथीचे दाणे

आपले गाल सुंदर आणि गोबरे करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा वापर करा. मेथीच्या दाण्यांमध्ये असलेले अॅन्टीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स चेहऱ्याच्या सैल पडलेल्या त्वचा मुलायम करतात. याचा वापर करण्यासाठी रात्रभर पाण्यामध्ये दाणे भिजत ठेवा आणि साकाळी उठल्यानंतर याची पेस्ट गालांवर लावा. पेस्ट जव्हा गालांवर सुकून जाईल त्यानंतर हलक्या गरम पाण्याने धुवून घ्या. 

2. मोहरीचं तेल 

गोबऱ्या गालांसाठी दररोज मोहरीच्या तेलाने मालिश करा. असं केल्याने काही दिवसांमध्येच गालांमध्ये फरक दिसून येईल. 

3. ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइल त्वचेसाठी अत्यंत लाभदायक असतं. दररोज एक चमचा ऑलिव्ह ऑइलने मालिश करा. त्यामुळे गाल आकर्षक होण्यास मदत होते. 

4. ग्लिसरीन आणि गुलाब पाणी 

ग्लिसरीन आणि गुलाब पाणी एकत्र करून मिश्रण तयार करा. त्यानंतर या मिश्रणाने दररोज गालांना मसाज करा. त्यामुळे गालांना आकर्षक लूक मिळतो. 

5. सफरचंद

सफरचंद गाल सुंदर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यासाठी सफरचंदाची पेस्ट तयार करून दररोज सकाळी चेहऱ्यावर लावा. काही वेळानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. 

6. दूध प्या
 
आहारात थोडासा बदल करूनही तुम्ही सुंदर गाल मिळवू शकता. तुम्ही दिवसातून दोन वेळा दूध प्या. असं केल्याने दूधामध्ये असणारी पोषक तत्व बसलेल्या गालांना गोबरे करण्यासाठी मदत करतात. 

7. पुरेशी झोप आणि पाणी घ्या 

सुंदर गालांसाठी झोप पूर्ण करा आणि त्याचसबोत मुबलक प्रमाणात पाणी प्या. असं केल्याने काही दिवसांतच तुम्हाला गोबरे गाल पाहायला मिळतील. 

8. गालांसाठी योगाभ्यास करा 

गालांना सुंदर आणि आकर्षक करण्यसाठी तुम्ही योगाभ्यासही करू शकता. नियमित योगाभ्यास केल्याने गाल सुंदर होऊ शकतात. 

...म्हणून बसतात गाल

आपण सर्वचजण जाणतो की, एका वयानंतर गाल बसणं हे नॉर्मल आहे. आता असं दिसून येत आहे की, कमी वयातच अनेकांचे गाल बसत आहेत. असं होण्यामागील मुख्य कारण म्हणजे, आहारतून पुरेसं पोषण मिळत नाही. खाण्यामध्ये पौष्टिक आहार म्हणजेच, फळं हिरव्या पालेभाज्या, दूध इत्यादींचा समावेश करणं आवश्यक असतं. कमी पाणी प्यायल्याने गालांच्या आरोग्यावर परिणाम होतो. याव्यतिरिक्त धुम्रपान केल्यानेही गाल बसतात. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.


Web Title: These ways to get chubby cheeks
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.