These shampoo mistakes that you should avoid during hair washing | केस गळण्यासाठी 'या' चुका ठरतात कारणीभूत; दाट आणि लांब केसांसाठी वाचा खास टिप्स

केस गळण्यासाठी 'या' चुका ठरतात कारणीभूत; दाट आणि लांब केसांसाठी वाचा खास टिप्स

केसांची काळजी नीट घेतली नाही तर केस गळायला सुरुवात होते. तुम्हीसुद्धा शॅम्पूचा वापर न करताच केस धुत असाल तर केसांचं नुकसान होऊ शकतं.  लांब, दाट केस तुम्हालाही हवे असतील तर रोज घाईघाईत तुम्ही केसांबाबत ज्या चुका करता त्या टाळायला हव्यात. केस शॅम्पू लावून धुणं यात कठीण असं काहीही नाही पण लहान सहान गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने मोठी किंमत मोजावी लागू शकते.

चुकिचा शॅम्पू वापरणं

तुमच्या डोक्याची त्वचा ड्राय किंवा ऑयली असेल, तुमचे केस ड्राय किंवा ऑयली असतील तसंच तुम्हाला डॅंड्रफची समस्या असेल तर योग्य शॅम्पूची निवड केली पाहिजे. तसेच सतत शॅम्पू बदलू नये. डॉक्टरांच्या  सल्ल्यानं शॅम्पू घ्यावा.

केस धुताना गरम पाण्याचा वापर

अनेकजण महागड्या शँम्पूने केस धुतात पण केस धुताना गरम पाण्याचा वापर करतात. गरम पाण्याने केस धुतल्यास केसांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे स्काल्प कोरडा पडून केस गळण्याची, कोंडा होण्याची समस्या उद्भवू शकते. तुम्ही कोमट पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करू शकता. पण गरम पाणी वापरणं टाळा. 

 कोमट पाण्याचा वापर केसांवर करण्याआधी केसांना तेल लावा. रात्री केसांना तेल लावून मसाज करा. याने केस ड्राय आणि डॅमेज होणार नाहीत. जर तुम्ही असं केलं नाही तर केस ड्राय होतील आणि केसांचा चमकदारपणाही जाईल. गरम पाणी वापरत असाल तर शॅम्पू करतेवेळी याची काळजी घ्या की, शॅम्पू लावताना थोडं गरम पाणी डोक्यावर घाला. जेणेकरून केसांमधील धूळ-माती, तेल निघून जाईल. शॅम्पू केल्यानंतर मग कोमट पाणी वापरा.

थंड पाण्याचा वापर

जर तुम्ही केसांना शॅम्पू करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करत असाल तर याने तुमच्या त्वचेवरील रोमछिद्रे बंद होतील. ज्याने केसांमधील मॉइश्चर बाहेर येऊ शकणार नाही आणि तुमचे केस ड्राय होत नाही. तसेच थंड पाण्याने केसांना न्यूट्रिएंट सुद्धा मिळतात.  पण थंड पाण्याचा वापर केल्यास ने केस पातळ होतात. हे त्यांच्यासोबत अधिक होतं जे लोक अनहेल्दी आहार घेतात.

चुकिच्या पद्धतीने केसं विचरणं

असं मानलं जातं की, रोज केसांमध्ये १०० स्ट्रोक्स असायला पाहिजे. पण हे अवलंबून यावर आहे की, तुम्ही कंगवा कसा फिरवता. कारण ड्राय केसांमध्ये सतत कंगवा फिरवल्याने केस तुटतील. तसेच केसांच्या मुळातही जास्त फ्रिक्शन होतं. ज्याने केस डॅमेज होतात. 

हे पण वाचा-

... म्हणून तुमच्या दाढीचा लूक बिघडतो; 'या' टीप्स वापरून मिळवा हॅण्डसम लूक  

'या' चुकांमुळे शेविंगनंतर त्वचेवर बारीक दाणे येतात, हॅण्डसम लूकसाठी वापरा 'हा' खास फंडा

Web Title: These shampoo mistakes that you should avoid during hair washing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.