घरी असो किंवा बाहेर सतत पिंपल्स येण्यासाठी 'या' गोष्टी ठरतात कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 19:02 IST2020-04-27T18:41:29+5:302020-04-27T19:02:12+5:30

बाहेर गेल्यानंतर धुळ आणि प्रदुषणामुळे पिंपल्स येतात पण घरी राहून सुद्धा पिंपल्स का येतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

These are the common causes of pimples on the skin myb | घरी असो किंवा बाहेर सतत पिंपल्स येण्यासाठी 'या' गोष्टी ठरतात कारणीभूत

घरी असो किंवा बाहेर सतत पिंपल्स येण्यासाठी 'या' गोष्टी ठरतात कारणीभूत

बदलती जीवनशैली, वातावरणातील बदल आणि प्रदुषणाचा परिणाम त्वचेवर होऊन त्वचेचं नुकसान होत असतं. पण काहीजणांना बाहेर जाता घरच्याघरी बसून सुद्धा पिंपल्सचा सामना करावा लागतो. बाहेर गेल्यानंतर धुळ आणि प्रदुषणामुळे पिंपल्स येतात पण घरी राहून सुद्धा पिंपल्स का येतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज आम्ही तुम्हाला पिंपल्स का येतात याच्या कारणांबाबत सांगणार आहोत. 

हार्मोनल बदल

शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात.  शरीरातील अँन्ड्रोजेन पातळी वाढल्यानंतर तुमच्या शरीरावर हार्मोनल एक्ने दिसू लागतात. तसंच सिबमची निर्मिती जास्त होण्यामागेही हेच कारण आहे, जे पिंपल्ससाठीही कारणीभूत ठरतं. स्त्रियांकरिता साधारणतः हार्मोनल बदल हे त्यांच्या पाळीच्या दिवसांमध्येही होत असतात.

पोट साफ नसेल तर

घरी बसल्यामुळे अनेकांची  पुरेशी हालचाल होत नाही. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही. परिणामी शरीरातील घातक नको असलेले पदार्थ शरीराबाहेर पडत नाही. त्यामुळे त्वचेतून पिंपल्सच्या माध्यामातून शरीरातील  नको असलेलं पदार्थ बाहेर पडत असतात. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित नसणं हे पिंपल्स येण्याचे कारण असू शकतं. 

केमिक्सयुक्त क्रिम्सचा वापर 

आजकाल मुलांना असो अथवा मुलाींना मेकअप करायला खूप आवडतं. त्यासाठी वेगवेगळी फेअरनेस क्रीम आणि स्टिरॉईड्स असलेली क्रीम चेहऱ्यावर लावली जातात. या स्टिरॉईड औषधांचा एक परिणाम म्हणून त्वचा पांढरी पडते. तो गोरेपणा नसतो. या क्रीममुळे पिंपल्स वाढतात. केमिकल्स त्वचेवर सुट न झाल्यामुळे पिंपल्स येतात. (हे पण वाचा-लॉकडाऊनमध्ये घरच्याघरी ताक वापरून ग्लोईंग स्किन मिळवा आणि सुरकुत्यांचं टेंशन विसरा)

आहारातील बदल

तिखट, चमचमीत मसालेदार पदार्थांचे, तळलेल्या पदार्थांचे वारंवार सेवन केल्यामुळे त्वचेवर पिंपल्स येतात. त्यासाठी आहारात फळांचा जास्तीत जास्त समावेश करणं गरजेचं आहे.  संत्री, द्राक्ष या फळांचा आहार घेतल्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होईल. त्वचेच्या तैलग्रंथी उत्तेजीत होऊन पिंपल्सची समस्या वाढत जाते. (हे पण वाचा-अंघोळ झाल्यानंतर 'या' चुका केल्यामुळे वयाआधीच दिसत आहात म्हातारे, वाचा कोणत्या...)

Web Title: These are the common causes of pimples on the skin myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.