'या' ५ कॉमन हेअरस्टाइलमुळे केसांचं होऊ शकतं नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 14:48 IST2019-02-11T14:47:21+5:302019-02-11T14:48:27+5:30
जास्तीत जास्त तरूणी आणि महिला त्यांच्या लूकमध्ये एक्सपरिमेंट करणे पसंत करतात. हे एक्सपरिमेंट सर्वात जास्त केसांसोबत केले जातात.

'या' ५ कॉमन हेअरस्टाइलमुळे केसांचं होऊ शकतं नुकसान!
(Image Credit : shefinds.com)
जास्तीत जास्त तरूणी आणि महिला त्यांच्या लूकमध्ये एक्सपरिमेंट करणे पसंत करतात. हे एक्सपरिमेंट सर्वात जास्त केसांसोबत केले जातात. वेगळ्या लूकसाठी अनेक तरूणी हेअरकटपासून ते हेअर स्टायलिंगपर्यंत काय काय करतात. या हेअरस्टाइलसाठी हिट, हॉट आयर्न, हेअर ड्रायरचा वापर केला जातो. पण याने भलेही केस चांगले होत असतील पण सोबतच केसांचं नुकसानही होतंच. असेच ५ कॉमन हेअरस्टाइल आम्ही तुम्हाला सांगतोय ज्यामुळे केसांचं नुकसान होऊ शकतं.
पोनीटेल
स्लीक आणि हाय-टाइट पोनीटेल दिसायला तर फारच सुंदर दिसते आणि याने चेहराही आकर्षक वाटतो. पण दररोज अशी हेअरस्टाइल केल्याने केसांचा व्हॉल्यूम कमी होतो आणि केस डॅमेज होतात. दररोज पोनीटेल करणे केसांसाठी नुकसानकारक आहे. यात जेव्हा तुम्ही केस मागच्या बाजूने ओढता तेव्हा केसांवर दबाव पडतो, केस तुटतात आणि डल सुद्धा होतात.
स्ट्रेट हेअर
स्ट्रेट हेअरस्टाइल अनेक तरूणी आणि महिलांमध्येही लोकप्रिय आहे. ही हेअरस्टाइल दिसायला सिंपल असते आणि ही हेअरस्टाइल करायला जास्त वेळही लागत नाही. कारण गरम स्ट्रेटनरने केस स्ट्रेट करायटे असतात आणि ही प्रोसेस सहज होते. पण नियमित केस स्ट्रेट केल्याने केस कमजोर होतात. तसेच ड्राय होतात आणि केसांचा नैसर्गिक चमकदारपणा निघून जातो.
कर्ल्स
अलिकडे ही हेअरस्टाइल सुद्धा चांगलीच लोकप्रिय झाली आहे. पार्टीला किंवा एखाद्या इव्हेंटसाठी ही हेअरस्टाइल केली जाते. पण ही नेहमीच ही हेअरस्टाइल करणे केसांसाठी नुकसानकारक ठरू शकते. केस नेहमी कर्ल केल्याने कमजोर आणि डल होतात.
टाइट वेणी
तुम्ही अनेकदा आई किंवा आजीकडून ऐकलं असेल की, वेणी घातल्याने केस चांगले होताता आणि वाढतात. पण सत्य वेगळं आहे. टाइट वेणी आणि उलट्या वेणीमुळे केसांच्या मुळांवर फार स्ट्रेस पडतो. यामुळे केस कमजोर होतात. केस तुटतात. तसेच केसांचा शेपही बिघडतो.
वेट हेअर लूक
वेट हेअर लूक केसांसाठी सर्वात हानिकारक आहे. आजकाल वेट हेअर लूकचा ट्रेन्ड आहे. पार्टीसाठी ही हेअरस्टाइल केली जाते. पण या हेअरस्टाइलने केस तुटतात आणि केस ड्रायनेसची समस्याही होऊ शकते.