उन्हाळ्यात घ्या केसांची काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST2018-03-27T09:11:59+5:302018-06-23T12:03:10+5:30

उन्हाळ्यातील उन्हाचा परिणाम शरीराबरोबरच केसांवरही होत असतो. शिवाय धूळ, माती व घामामुळेही केसांमध्ये चिकटपणा येतो, परिणामी केसात कोंडा आणि डोक्यावरील त्वचा रुक्ष होते.

Take care of the hair in the summer! | उन्हाळ्यात घ्या केसांची काळजी!

उन्हाळ्यात घ्या केसांची काळजी!

्हाळ्यातील उन्हाचा परिणाम शरीराबरोबरच केसांवरही होत असतो. शिवाय धूळ, माती व घामामुळेही केसांमध्ये चिकटपणा येतो, परिणामी केसात कोंडा आणि डोक्यावरील त्वचा रुक्ष होते. त्यामुळे या दिवसात केसांची विशेष काळजी घ्यायला हवी. त्यासाठी काही टिप्स दिल्या असून त्या फॉलो केल्यास केसांचे आरोग्य उत्कृष्ट राहू शकते. 

* या दिवसात उन्हाच्या तडाख्यापासून तसेच धूळ आणि माती यापासून बचावासाठी घरातून बाहेर पळताना स्कार्फचा वापर करावा.

* या दिवसात केसांत घाम होत असल्याने आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा केस धुणो गरजेचे आहे. तुमचे केस तेलकट असतील तर प्रत्येक दुस:या दिवशी केस धुवायला हवेत. 

* या दिवसात केसांत कोंडादेखील होतो, तो होऊ नये म्हणून केसांच्या मुळांना लिंबाचा रस लावून 20 मिनिटापयर्ंत ठेवावे. मग गार पाण्याने केस धुऊन टाकावे. कोंडा काढण्याचा हा सर्वांत उत्तम उपाय आहे.

* केसांच्या आरोग्यासाठी आवळादेखील उत्तम पर्याय आहे. केसांना आवळा लावल्यानेसुद्धा केस चांगले रहातात.

* केसांमधील धूळ, माती निघण्यासाठी केसांवर सारखे कंगवा फिरवायला हवा. तसेच केसांना हर्बल ऑइलने मसाज केल्यास उत्तम. 

* शॉपूचा अति वापर टाळावा, कारण याने केस कोरडे होतात. म्हणून चांगल्या कंपनीच्या शँपूचा वापर करावा. 

* मेंदीत लिंबाचा रस आणि एक अंडं फेटून पॅक तयार करून केसांना लावा. त्यामुळे केसांची चमक तर वाढतेच आणि गरमीत आरामही मिळतो. केसांना जास्त गरम किंवा थंड पाण्याने धुऊ नये. केसांना धुतल्यानंतर कंडिशनर लावावा. 


Web Title: Take care of the hair in the summer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.