मेकअपवेळी टिश्यू पेपरच्या 'या' खास ट्रिक वापराल तर तुमचं काम होईल सोपं, कसं ते वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 11:30 IST2020-01-17T11:21:15+5:302020-01-17T11:30:20+5:30
टिश्यू पेपर एक वस्तू आहे जी प्रत्येक मुलीच्या बॅगमध्ये असतेच आणि त्यांच्याकडे याची कमतरता देखील राहत नाही. याचा वापर आपल्य पर्सनल हायजिनसोबतच इतरही कामांसाठी केला जातो.

मेकअपवेळी टिश्यू पेपरच्या 'या' खास ट्रिक वापराल तर तुमचं काम होईल सोपं, कसं ते वाचा...
(Image Credit : thekrazycouponlady.com)
टिश्यू पेपर एक वस्तू आहे जी प्रत्येक मुलीच्या बॅगमध्ये असतेच आणि त्यांच्याकडे याची कमतरता देखील राहत नाही. याचा वापर आपल्य पर्सनल हायजिनसोबतच इतरही कामांसाठी केला जातो. आतापर्यंत तुम्ही टिश्यू पेपरचा वापर मेकअप रिमुव्ह करण्यासाठी, पसरलेलं लिपस्टिक किंव काजळ-आयलायनर काढण्यासाठी करत आल्यात. पण याव्यतिरिक्तही टिश्यू पेपर फार कामाची वस्तू आहे.
(Image Credit : boldsky.com)
टिश्यू पेपरशी संबंधित ब्युटी ट्रिक्स जाणून घेण्याआधी हे लक्षात घ्या की, तुम्हाला चांगल्या टिश्यू पेपरचा वापर करावा. रंगीत नाही तर पांढऱ्या टिश्यू पेपरचा वापर करा. काही टिश्यू पेपरतर न्यूट्रल पीएच लेव्हलसोबत येतात, जे त्वचेसाठी घातक नसतात. तुम्ही लो क्वालिटीऐवजी प्रिमीअम ब्रॅन्डचे टिश्यू पेपर वापरा. कारण याचा वापर तुम्ही चेहऱ्यावरही करू शकता. चला आता जाणून घेऊन टिश्यू पेपरची ब्युटी ट्रिक्स, ज्याने तुमचं काम सोपं होईल.
नॉर्मल लिपस्टिकला करा मॅट
(Image Credit : morphe.com)
तुम्ही नेहमीप्रमाणे लिपस्टिक लावा. आता ओठांवर एक टिश्यू पेपर ठेवून ओठांनी दाबावे. आता ब्रशच्या मदतीने हलका ट्रान्सलूसेंट पावडर ओठांवर लावा. हे ओठांच्या रेषांमध्ये जाईल आणि तुमच्या ओठांना एक मॅट लूक मिळण्यास मदत होईल.
आयशॅडोमुळे मेकअप होणार नाही खराब
हे तुमच्यासोबत कितीतरी वेळा झालं असेल की, आयशॅडोचे कण तुमच्या गालांवर पडून तुमचं मेकअप बिघडलं असेल. पण तुम्ही एका सोप्या ट्रिकने ही समस्या दूर करू शकता. जेव्हा तुम्ही तुमचा आय मेकअप कराल तेव्हा गालावर एक टिश्यू पेपर ठेवावा. जेव्हा मेकअप पूर्ण होईल तेव्हा टिश्यू पेपर काढा. तुमचं मेकअप बिघडणार नाही.
ब्लॅकहेड्ससाठी पोस स्ट्रिप्स
चेहऱ्यावर गरम पाण्यात भिजलेला टॉवेल ठेवा, याने तुमचे त्वचेवरील पोर्स मोकळे होतील. आता एक चमचा अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यात काही थेंब टी ट्री ऑइल टाका. आता टिश्यू पेपर स्ट्रिपसारखं कापा. आता नाकावर मास्कचा एक पातळ थर लावा. आता त्यावर टिश्यू पेपर ठेवा आणि त्यावरून मास्कचा आणखी एक थर लावा. १५ मिनिटांनी हे काढून टाका. याने ब्लॅकहेड्स निघून जातील.
आयर्न करताना केस जळणार नाहीत
ही ट्रिक फारच उपयोगी अशी आहे. आधी कर्लिंग रॉड किंवा स्ट्रेटनरला टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा. असं केल्याने केसांना हीटमुळे कमी नुकसान पोहोचेल आणि सोबतच केस जळण्याचा धोकाही कमी होईल.
लिपस्टिक जास्त वेळ टिकेल
जर तुम्हाला लिपस्टिक जास्त वेळ टिकवून ठेवायचं असेल तर ही ट्रिक तुम्हाला फायदेशीर ठरेल. लिपस्टिकचा एका कोट लावा आणि आता टिश्यू पेपर ओठांच्या मधे ठेवा आणि दावा. पेपर काढा. आता त्यानंतर लिपस्टिकचा दुसरा कोट लावा. तुमचे ओठ मुलायम, आकर्षक दिसतील आणि लिपस्टिक जास्त वेळ टिकेलही.