शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जेवणानंतर म्हणतं असाल 'कुछ मीठा हो जाये'; तर असं पडेल महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 14:08 IST

तुम्हालाही जेवल्यानंतर काहीना काही गोड खाण्याची सवय आहे का? जर असं असेल तर अशी सवय असणारे तुम्ही एकटे नाही. अनेक लोकांना जेवल्यानंतर काहीतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते, एवढचं नाही तर जोपर्यंत एखादा गोड पदार्थ ते खात नाहीत तोपर्यंत त्यांचं जेवण पूर्ण झाल्यासारखं त्यांना वाटत नाही.

तुम्हालाही जेवल्यानंतर काहीना काही गोड खाण्याची सवय आहे का? जर असं असेल तर अशी सवय असणारे तुम्ही एकटे नाही. अनेक लोकांना जेवल्यानंतर काहीतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते, एवढचं नाही तर जोपर्यंत एखादा गोड पदार्थ ते खात नाहीत तोपर्यंत त्यांचं जेवण पूर्ण झाल्यासारखं त्यांना वाटत नाही. एवढं ठिक आहे. परंतु जर तुम्हाला गोड पदार्थ किंवा साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाण्याची सवय लागली असेल, तसेच हे पदार्थ खाल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नसेल तर तुम्ही स्वत:च्या हाताने तुमची स्किन डॅमेज करण्याचं कारण ठरत आहात. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, गोड किंवा साखरयुक्त पदार्थांच्या अतिसेवन तुमची स्किन आणि खासकरून तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेला नुकसान पोहचवण्यासाठी कसं कारणीभूत ठरतं त्याबाबत...

त्वचेला जळजळ होणं

एका संशोधनानुसार, जेव्हा आपण काही गोड पदार्थ खातो. त्यावेळी शरीराच्या साखरेच्या पातळीमध्ये वाढ होते. त्यासाठी आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार होत असतं. जे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवण्यासाठी मदत करतं. पण ज्यावेळी तुम्ही जास्त गोड पदार्थांचे सेवन करता त्यावेळी साखरेचे प्रमाण स्थिर ठेवण्यासाठी इन्सुलिन जास्त प्रमाणात शरीरामध्ये पसरतं परिणामी त्वचेला जळजळ होणं, सूज येणं आणि इन्फेक्शन होण्यासारख्या समस्या उद्भवतात. अनेकदा तर त्वचेवर लाल चट्टेदेखील येतात. जर तुम्हाला आधीपासूनच अॅक्ने किंवा पिम्पल्सच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर ही समस्याही वाढू शकते. 

ब्रेकआउट्सचा धोका अधिक

जास्त गोड पदार्थ किंवा साखरेचे सेवन केल्याने चेहऱ्यावर अॅक्नेची समस्या वाढते. ज्यामुळे सर्वात आधी तुमच्या त्वचेवर जळजळ होण्यास सुरुवात होते. अनेकदा तर गोड पदार्थांच्या अतिसेवनाने व्हाइट ब्लड सेल्सला इन्फेक्शनशी लढण्यापासून रोखण्यात येतं. ज्यामुळे अ‍ॅक्ने आणि पिम्पलची समस्या आणखी वाढते. 

कोलोजेन (collagen)साठी हानिकारक

ज्यावेळी तुम्ही जास्त गोड पदार्थ खाता त्यावेळी तुमच्या शरीरातील शुगर कोलोजेन प्रोटीनसोबत अटॅच होउन ग्लायकेशन करतं. या प्रक्रियेला अ‍ॅडवान्स ग्लायकेशन अ‍ॅन्ड प्रोडक्ट (AGE) तयार होतं. जे शरीरातील कोलेजनवर अटॅक करतं. ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात आणि त्वचेवर वाढत्या वयाचीही लक्षणंही दिसू लागतात. 

अ‍ॅलर्जी वाढविण्यासाठी कारणीभूत 

जर तुम्हाला एखादं स्किन इन्फेक्शन झालं असेल तर जास्त गोड पदार्थ खाल्याने अ‍ॅलर्जी वाढू शकते. जर तुमच्या त्वचेवर जळजळ होत असेल आणि त्यावेळी तुम्ही एखादा गोड पदार्थ खात अचसाल तर अ‍ॅलर्जी आणखी वाढू शकते. जर तुम्हाला फूड अ‍ॅवर्जीची समस्या असेल तर साखरेपासून आणि अतिगोड पदार्थांपासून शक्यतो दूरच राहा. कारण यामुळे अ‍ॅलर्जी आणखी वाढू शकते. 

चेहऱ्याची त्वचा लाल होणं

क्यूट रेड फेस किंवा पिंक रेड फेस सर्वांनाच हवाहवासा वाटतो. कारण हा एक नॅचरल हेल्दी ग्लो असतो. परंतु गोड आणि साखर असलेल्या पदार्थांचे अधिक सेवन केल्याने त्वचेवर जळजळ होते आणि त्यामुळे स्किनवर लाल चट्टे येतात. तसेच यामुळे स्किन डॅमेज होते. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य