मेकअपसाठी स्पंज आणि मस्काराचा वापर करता का? वेळीच व्हा सावध....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 11:21 IST2019-12-17T11:15:04+5:302019-12-17T11:21:08+5:30
मेकअपबाबतची क्रेझ महिलांमध्ये किती असते हे तुम्हाला माहीत आहेच. सौंदर्य वाढवणाऱ्या मेकअप प्रॉडक्ट्सचा त्या नेहमीच शोध घेत असतात.

मेकअपसाठी स्पंज आणि मस्काराचा वापर करता का? वेळीच व्हा सावध....
(Image Credit : stylecraze.com)
मेकअपबाबतची क्रेझ महिलांमध्ये किती असते हे तुम्हाला माहीत आहेच. सौंदर्य वाढवणाऱ्या मेकअप प्रॉडक्ट्सचा त्या नेहमीच शोध घेत असतात. अशात आम्ही तुम्हाला मेकअप प्रॉडक्टबाबत एक महत्वाची माहिती सांगणार आहोत. एका रिसर्चनुसार, ब्युटी ब्लेंडर म्हणजेच मेकअप स्पंज आणि इतरही काही प्रॉडक्ट्समध्ये बॅक्टेरिया वाढतात.
मेकअप प्रॉडक्ट्समध्ये सुपरबग्स
अमेरिकेतील एस्टन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चनुसार मेकअप प्रॉडक्टमध्ये जीवघेणे बॅक्टेरिया असल्याचं समोर आलं आहे. रिसर्चमध्ये अभ्यासकांनी सांगितलं की, ब्युटी ब्लेंडर, मेकअप स्पंज, मस्कारा आणि लिप ग्लॉस सारख्या अनेक मेकअप प्रॉडक्टमध्ये जीवघेणे बॅक्टेरिया राहतात.
गंभीर आजारांचा धोका
या रिसर्चचे मुख्य लेखक अमरीन बशीर म्हणाले की, यूकेमध्ये लाखो लोक दररोज ज्या मेकअप प्रॉडक्ट्सचा वापर करत आहेत त्यात संभावित जीवघेणे सुपबग्स जसे की, ई-कोलाई आणि स्टॅफीलोकोकी सारखे बॅक्टेरिया आढळून आलेत. याचं कारण आहे की, हे प्रॉडक्ट्स बरेच दिवस साफ केले जात नाहीत आणि अनेकजण तर ते एक्सपायर झाल्यावरही त्यांचा वापर करतात. यातील ई-कोलाई बॅक्टेरिया जास्त नुकसानकारक नसतात. पण काही इतके घातक असतात की, ज्यांच्यामुळे डायरिया, किडनी फेलिअर आणि मृत्यू होण्याचाही धोका असतो.
स्पंजमध्ये ९३ टक्के बॅक्टेरिया
जर्नल ऑफ अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रकाशित या रिसर्चनुसार, मेकअप प्रॉडक्ट्समध्ये आढळणाऱ्या बॅक्टेरियामुळे केवळ स्किन इन्फेक्शनच नाही तर ब्लड पॉयजनिंग सुद्धा होऊ शकतं. तसेच याचा वापर डोळे, तोंडाच्या जवळपास केला तर याने जीवाला धोका होऊ शकतो. रिसर्चदरम्यान फाउंडेशन, कन्सीलर आणि कॉम्पॅक्ट चेहऱ्यावर लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मेकअप स्पंज किंवा ब्युटी ब्लेंडरमध्ये जास्तीत जास्त ९३ टक्के नुकसानकार बॅक्टेरिया आढळून आलेत.