आनंदी राहण्यासाठी काही टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 21:05 IST2016-03-19T04:05:06+5:302016-03-18T21:05:06+5:30

जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी कोणतीही जादू नाही.

Some tips to stay happy | आनंदी राहण्यासाठी काही टिप्स

आनंदी राहण्यासाठी काही टिप्स

 
ण दिवसातून कसरत करणे हे खूप महत्वाचे आहे. संशोधननानुसार कसरतीमुळे तणाव सुद्धा कमी होतो. यामध्ये सायकल चालविणे, योगा व डान्स असे कोणतीही कसरत ही खूप महत्वाची आहे. यामुळे माणसाचा मूडही लवकर चांगला होतो. तसेच दररोज अर्धा तास वॉकिंग करणेही पुरेसे आहे. आनंदी राहण्यासाठी अशा काही या वेगवेगळ्या कसरतीची ही माहिती.
योगा : आपल्याला खूप राग येत असेल किंवा तणावात असाल. अशाप्रसंंगी आपण योगा करणे हे खूप आवश्यक आहे. योगा केल्याने आपल्याला तणावातून मुक्ती मिळू शकते.
हिरव्या पालेभाज्या : प्रत्येक हिरव्या भाजीमध्ये आपले आनंदी राहणे लपलेले आहे. यामध्ये पालक व कोबीं या भाज्यांचे आवश्य जेवणात समावेश करावा. या भाज्यांमुळे नकारात्मक विचार कमी होतात. तसेच ताण तणाव सुद्धा कमी होतो. स्वत : ला आपण नेहमी आनंदी असल्याचे वाटते.
ताजे फु ल : घरी किंवा कामाच्या ठिकाणी आपण जर एखादे ताजे फुल ठेवले तर दिवसभर आपण खूश राहू शकतो. हे हार्वडच्या रिसर्च टिमचे म्हणणे आहे.
उन्हात फिरा : मूड चांगला नसेल तर त्याकरिता घरातून बाहेर पडून, २० ते २५ मिनीटे उन्हात फिरा. यामुळे शरीराला विटामिन डी मिळते. काहीवेळेला विटामिनच्या कमतरतेमुळेही तणाव वाढतो. त्याकरिता आनंदी होण्यासाठी थोडा वेळ उन्हात आवश्य जा.
ध्यान : तणाव घालविण्यासाठी सर्वात वेगळे ध्यान करणे हे खूप आवश्यक आहे. यामुळे कोणताही साईड इफे क्ट होत नाही.
कुत्रा व मांजर पाळा : घरामध्ये कुत्रा किंवा मांजर पाळल्यामुळे आपला आनंदी निश्चतीतच वाढतो. कारण की, आपण आपले काम संपूण घरी आलो तर त्यांच्यासोबत वेळ घातल्यामुळे संपूर्ण तणाव नाहीसा होतो.
आवडती गाणी ऐका : घरामध्ये असताना तणाव असेल तर काहीही न करता केवळ आपल्याला आवडणारी गाणी ऐकावी. त्यामुळे तुरंत आपल्याला आनंद वाटेल.

 

Web Title: Some tips to stay happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.