मीठाला पर्याय ‘फिश सॉस’चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:38 IST2016-02-06T03:08:42+5:302016-02-06T08:38:42+5:30
मीठाला पर्याय म्हणून ‘फिश सॉस’ आपण रोजच्या जेवणात वापरू शकतो.

मीठाला पर्याय ‘फिश सॉस’चा
म ठ नसेल तर जेवणाला चव काय? परंतु, मीठाचे प्रमाण अधिक असेल तर अनेक आजारांना ते कारणीभूत ठरू शकते. सोडियम आणि क्लोरिनपासून तयार होणाºया मीठातील सोडियमचे अतिप्रमाण शरीरासाठी धोकादायक असते. म्हणून जेवणातून मीठाचे प्रमाण करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण जर चवच नसेल तर जेवण्यास मजा काय? मीठाला पर्याय म्हणून ‘फिश सॉस’ आपण रोजच्या जेवणात वापरू शकतो. नवीन रिसर्चमधून असे दिसून आले की, मीठाच्याऐवजी आपण फिश सॉसचा उपयोग करू शकतो. त्यामुळे सोडियमचे प्रमाण कमी होण्यास मदत तर होतेच सोबत रुचकरपणा टिकून राहतो.
.jpg)
मलेशियातील टेलर्स विद्यापीठातील संशोधकांना असे आढळून आले की, चिकन रस्सा, टोमॅटो सॉस आणि नारळाची करीमध्ये ‘व्हिएतनामी फिश सॉस’ वापरला असता त्यामधील सोडियम क्लोराइडचे प्रमाण 10 ते 25 टक्क्यांनी कमी होते आणि पदार्थांचा स्वादिष्टपणा, खारटपणा आणि एकंदर चव टिकून राहते. यासंदर्भातील लेख जर्नल आॅफ फूड सायन्समध्ये प्रकाशित झाला आहे. अनेक दक्षिणपूर्व आशिया भागातील जेवणात फिश सॉसचा उमामी चवीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
समुद्रमीठ आणि मांदेळी मासे आठ ते बारा महिने एकत्र आंबवून फिश सॉस बनवला जातो. या प्रक्रियेत प्रोटिनचे विघटन होऊन त्याचे अॅमिनो अॅसिडमध्ये रुपांतर होते. त्यामुळे उमामी चव वाढते. प्रोटिन स्त्रोत आणि चव वाढवणारा मसाला म्हणून फिश सॉसचा उपयोग केला जाऊ शकतो. सोडियमचे कमी प्रमाण असलेले खाद्यपदार्थ बनवण्यात या रिसर्च खूप फायदा होणार आहे. चवीशी तडजोड न करता आरोग्याला लाभदायक पदार्थ फिश सॉसमुळे बनविणे शक्य आहे. म्हणजे आता मिठाला पर्याय मिळाला आहे असे म्हणायला हरकत नाही.