(image credit-momjunction)

वजन वाढीमुळे किंवा बाळंतपणानंतर शरीरावर आलेले स्ट्रेच  मार्क्स घालवणे. हे प्रत्येक महिलेसाठी डोकेदुखी ठरत असते. स्ट्रेच मार्क घालवण्यसाठी महिला वेगवगळेया पर्यायांचा अवलंब करत असतात. पोटावर, खांद्यावर, छातीवर, पायावर, पार्श्व भागावर अशा अनेक ठिकाणी स्ट्रेच मार्क्स येतात. अचानक वजन वाढल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे स्ट्रेच मार्क्स येतात. यासाठी टेंशन  घेण्याचं काहीही कारण नाही. घरगुती वापरात असलेल्या काही गोष्टांचा वापर करुन शरीरावर असलेले स्ट्रेच मार्क्स घालवू शकता. आज जाणून घेऊया घरगुती घटकांचा वापर करून कशाप्रकारे स्ट्रेच स्मार्क दूर करता येतील.


१) कॉफी मास्क

(image credit -steptohealth)

चार चमचे कॉफी पावडर घ्या. आणि त्यात ५-६ चमचे नारळाचं तेल टाका. हे मिश्रण एकत्र करा. यात तुम्ही ताजा कोरफडीचा रस सुध्दा घालू शकता. आणि हे मिश्रण शरीरावरील स्ट्रेच मार्क असणाऱ्या भागांना लावा. हा थर सुकल्यानंतर अर्ध्या तासाने हातावर पाणी घेऊन स्ट्रेच मार्क असणाऱ्या भागांवर मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने साफ करा. त्यानंतर मॉईश्चराईजर लावा. हा प्रयोग आठवड्यातून २ दिवस केल्याने काही महिन्यात तुमचे स्ट्रेच मार्क नाहीसे होतील.

 २) अंड
 

अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रोटीन असते. यामुळे हे स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी फायदेशीर ठरते. अंड्यांचा पांढरा भाग घेऊन स्ट्रेच मार्क्सवर जाडसर थर लावा. थर पूर्णपणे सुकल्यावर पाण्याने स्वच्छ करा. आणि मग त्यावर ऑलिव्ह ऑइल लावा. कोरफडचा गर स्ट्रेच मार्क्सवर लावा. असे नियमित केल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होतील.

३) कोरफड 

(image credit-indiamart)

कोरफड स्ट्रेच मार्क्स घालाविण्यासाठी फायदेशीर ठरतं. जेल वापरण्याच्या तुलनेत कोरफडीचा वापरणे जास्त चांगले. कोरफडीमधील गर काढून घेऊन स्ट्रेच मार्क्स वर लावावा. हा गर स्ट्रेच मार्क्स वर दोन ते तीन तास लावून ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने पुसा. असे केल्याने काही महिन्यात तुमचे स्ट्रेच मार्क नाहीसे होतील.

Web Title: solution for remove stretch marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.