मंद सुगंध झोपेसाठी फायद्याचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 07:53 IST2016-03-10T14:53:11+5:302016-03-10T07:53:11+5:30

गंध आणि आवाजामुळे झोपलेल्या व्यक्तींचा फायदाच

Smooth aroma is beneficial for sleeping | मंद सुगंध झोपेसाठी फायद्याचा

मंद सुगंध झोपेसाठी फायद्याचा

ong>मनुष्य झोपेतही नवीन शिकत असतो आणि झोपेतून उठल्यावर त्या गोष्टीचा परिणाम त्याच्यावर जाणवतो, असे नवीन संशोधनात आढळले आहे. इस्त्रायलमधील वाइझमन इन्स्टिस्ट्यूटमध्ये झोपेबाबत संशोधन करण्यात आले.

झोपलेल्या व्यक्तींना एक विशिष्ट आवाज ऐकवला गेला. त्यानंतर एक विशिष्ट प्रकारचा गंध सोडण्यात आला. झोपलेल्या व्यक्तीकडून हा गंध हुंगला जात असे. मात्र, काही वेळा वातावरणात गंध सोडलेला नसतानाही फक्त तो विशिष्ट आवाज काढण्यात आल्यानंतर झोपलेल्या व्यक्तीकडून हुंगण्याची क्रिया घडत असे. गंध आणि आवाजाचा मेळ तयार करण्यात आला होता.

मात्र, आवाजानंतर गंध येत असल्याची ठाम कल्पना असल्यामुळे आवाज आल्यानंतर गंध आला नाही तरी हुंगण्याची क्रिया आपोआपच होत असे. गंध आणि आवाजामुळे झोपलेल्या व्यक्तींचा फायदाच होत असे. गंध आणि आवाजामुळे व्यक्तींची झोपमोड होत नसे.

उलट त्यातील काही गंधांमुळे त्यांना आणखी गाढ झोप येते असेही यात दिसून आले. 

Web Title: Smooth aroma is beneficial for sleeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.