(Image Credit : Vocalites)

त्वचेच्या सौंदर्यासाठी आपण अनेक उपाय करतो. पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंट्स घेणं, बाजारातील विविधं कपन्यांचे प्रोडक्ट्स वापरणं यांसारख्या अनेक गोष्टी करत असतो. पण तुम्ही कधी ऐकलंय का? त्वचा मुलायम करण्यासाठी किंवा त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी स्वतःच्या थोबाडीत मारणं फायदेशीर ठरतं. सध्या एक विचित्र ट्रेन्ड समोर येत आहे. यामध्ये अनेक लोक स्वतःच स्वतःच्या थोबाडीत मारून घेतात. तुम्ही म्हणाल की, हे काय भलतचं... पण खरचं असं आहे. 

मग कसला विचार करताय? ग्लोइंग फेससाठी तुम्ही स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायला तयार आहात का? खरं तर या थोबाडीत मारण्याच्या ट्रेन्डला स्लॅपिंग थेरपी म्हणतात. अनेक ब्युटी एक्सपर्ट्सच्या मते, थोबाडीत मारल्याने चेहऱ्याच्या त्वचेमधील ब्लड फ्लो वाढतो आणि स्किन ऐनर्जेटिक होते. तसेच चेहऱ्यावर क्रिम किंवा मॉयश्चरायझर लावल्यानेही असं होतं. 

एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, थोबाडीत मारल्याने कोलेजनची पातळी सुधारण्यासही मदत होते. ज्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यासाठी मदत होते. दरम्यान, थोबाडीत मारणं म्हणजे, स्वतःला नुकसान पोहोचवणं असा होत नाही.

तुम्हाला फक्त तुमच्या त्वचेवर थोडं प्रेशर द्यायचं असतं. ज्यामुळे चेहऱ्यावरील ब्लड फ्लो वाढतो. तुम्ही असं केल्याने तुमच्या त्वचा उजळण्यास मदत होते. स्लॅपिंग थेरेपीमुळे क्रिम आणि ऑइल त्वचेमध्ये अब्जॉर्ब होण्यासही मदत होते. यामुळे त्वचा मुलायम होते. 

कोरिया आणि अमेरिकेमध्ये त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी स्लॅपिंग थेरेपी फार लोकप्रिय होत आहे. अनेक लोक त्वचा मुलायम करण्यासाठी आणि त्वचेवरील रिंकल्स दूर करण्यासाठी याचा फार वापर करतात. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.


Web Title: Slap therapy for soft and glowing skin
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.