दारूचे व्यसन कमी करण्यासाठी 'लिव्हर हार्मोन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 11:28 IST2016-01-16T01:07:59+5:302016-02-10T11:28:05+5:30

व्यसन ही अशी गोष्ट आहे जी सुटता सुटत नाही आणि जर दा...

To reduce alcohol addiction, 'lever hormone' | दारूचे व्यसन कमी करण्यासाठी 'लिव्हर हार्मोन'

दारूचे व्यसन कमी करण्यासाठी 'लिव्हर हार्मोन'

यसन ही अशी गोष्ट आहे जी सुटता सुटत नाही आणि जर दारूचे व्यसन असेल तर मग विचारूच नका. विशेष म्हणजे, बर्‍याच जणांना ठाऊक नाही की गोड खाण्याचेसुद्धा व्यसन असते. अनेक आजारांच्या पाठीमागे साखर हेच कारण आहे. परंतु आता अशा हार्मोनचा शोध लागला आहे जो साखर आणि दारूचे व्यसन कमी करू शकतो.
आपल्या यकृतामध्ये तयार होणारे हे 'लिव्हर हार्मोन' गोड आणि अल्कोहलची इच्छा कमी करते. टेक्सस साऊथवेस्टर्न मेडिकल विद्यापीठाचे प्राध्यापक स्टीव्हन क्लिवर यांनी माहिती दिली की, 'सस्तन प्राण्यांमध्ये प्रथमच अशा हार्मोनचा शोध लागला आहे जो गोड आणि अल्कोहलवर परिणाम करतो.'एफजीएफ२१ असे या हार्मोनचे नाव असून खाण्यापिण्यातील बदल आणि थंड तापमानामुळे निर्माण होणार्‍या तणावाशी त्यांचा संबंध असतो. त्यांच्या विशेष गुणधर्मांमुळे प्रोटिनचे रुप देऊन लठ्ठपणा आणि टाईप-२ मधुमेहावर उपायकारक औषधे तयार करण्याचे संशोधकांचे प्रयत्न करत आहेत.

Web Title: To reduce alcohol addiction, 'lever hormone'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.