पहिल्यांदाच कान टोचल्यावर कशी घ्याल त्वचेची काळजी? इन्फेक्शनपासून करा बचाव....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 09:57 IST2020-01-06T09:53:23+5:302020-01-06T09:57:41+5:30
लहान मुलांचे कान टोचण्याची आपल्याकडे प्रथा आहे. पण कान टोचल्यानंतर काही दिवस अनेकांना वेगवेगळा त्रास होतो.

पहिल्यांदाच कान टोचल्यावर कशी घ्याल त्वचेची काळजी? इन्फेक्शनपासून करा बचाव....
(Image Credit : momjunction.com)
लहान मुलांचे कान टोचण्याची आपल्याकडे प्रथा आहे. पण कान टोचल्यानंतर काही दिवस अनेकांना वेगवेगळा त्रास होतो. वेदना होण्यासोबतच छिद्र केलं त्या ठिकाणावर सूजही येते. त्यामुळे कान टोचल्यानंतर त्या त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. खासकरून लहान मुलांना कान टोचल्यानंतर वेगवेगळ्या समस्या होतात. त्यांच्या नाजूक आणि कोमल त्वचेवर रॅशेज आणि जखमाही होतात. त्यामुळे अशात त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
केवळ सोन्याचा वापर
कान टोचल्यानंतर किंवा नाक टोचल्यानंतर खाज आणि इरिटेशनसारख्या समस्या होतात. अशात धातुपासून तयार रिंग कानात किंवा नाकात घातल्याने ही समस्या अधिक वाढू शकते. पण सोन्याची रिंग घातल्याने खाज किंवा इरिटेशनची समस्या होत नाही. कारण यात निकेल कमी प्रमाणात मिश्रित केला जातो.
स्वच्छतेची घ्या काळजी
इन्फेक्शनपासून बचावासाठी कानाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागते. जर कुणाचे कान टोचले असतील आणि एखादी जुनी रिंग कानात घालायची असेल तर आधी स्वच्छतेची काळजी घ्या. इअररिंग आधी स्टर्लाइज करा नंतर वापरा. इअररिंगचा स्वच्छता गरम पाण्याने करावी. सोन्या-चांदीचे इअररिंग सुद्धा २० मिनिटे गरम पाण्यात ठेवून नंतर घालावी.
हळदीचा लेप
पिअर्सिंग म्हणजेच कान टोचल्यानंतर कानाच्या त्वचेवर हळदीचा लेप लावावा. हळदीसोबत थोडं खोबऱ्याचं तेल लावा, याने जखम लवकर भरण्यास मदत होईल. कारण हळदीमध्ये अॅंटी-सेप्टिक आणि अॅंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. याने जखम लवकर भरते आणि आराम मिळतो.