शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
3
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
4
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
5
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
6
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
7
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
8
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
9
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
10
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
11
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
12
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
13
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
14
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
15
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
16
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
17
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
18
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
19
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
20
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई

​मेंदी लावताय !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 19:44 IST

भारतात मेंदीला अनन्य साधारण महत्त्व आहे. कोणताही सभारंभ हा मेंदी शिवाय अपूर्णच म्हणावा लागेल.

रवींद्र मोरे भारतात मेंदीला अनन्य साधारण महत्त्व आहे. कोणताही सभारंभ हा मेंदी शिवाय अपूर्णच म्हणावा लागेल. लग्नात तर नवरी मुलगीच्या हातावर मेंदी काढणे हा एक आगळा वेगळा सोहळाच असतो. नक्षीदार मेंदी काढून घेणे हा नवरीचा अट्टहास असतो. त्यातच नवरदेवाच्याही हातावर आकर्षक मेंदी काढली जाते. या मेंदीचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत हे अलीकडच्या एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. नेमका हाच आढावा आजच्या लेखातून घेऊया...मेंदीचा उपयोगमेंदीचा वापर सौंदर्यप्रसाधनाबरोबरच वस्त्रोद्योगात कापड रंगविण्यासाठीही करतात. पिवळा, तांबडा, पगट, शेंदरी असे रंग विविध पदार्थाच्या मिश्रणाने तयार करून वापरले जातात. पानांमध्ये ‘लॉसोन’ हे रसायन असते ज्याला ‘हेन्नोटॅनिक आम्ल’ असेही म्हणतात. या आम्लामुळेच त्वचेला किंवा केसांना रंग येतो.मेंदीच्या पानातील सेल्युलोजमधून रंगद्रव्ये विरघळून पसरण्यासाठी काही काळ लागतो. त्यासाठी त्वचा चांगली रंगण्यासाठी मेंदीचा लेप ६ ते १२ तास व्यवस्थित राहणे आवश्यक असते. याशिवाय चामड्याच्या वस्तू, रेशीम आणि लोकर रंगवण्यासाठीही मेंदीचा वापर होतो. आम्लाबरोबर मेंदीचा रंग आणखी गडद होतो म्हणूनच मेंदीचा वापर करताना लिंबू रस, चहा यांचा वापर केला जातो.मेंदीच्या फुलांपासून हीना नावाचे अत्तर बनते. मेंदीची पेस्ट भाजले, कापले, खरचटले, कीटकदंश आदींनी त्वचेवर आलेल्या सुजेवर गुणकारी असते. मेंदीची पाने वांतिकारक व कफोत्सर्गक आहेत. बिया आतड्यांसाठी स्तंभक असून ज्वरशामक व चित्तभ्रमात उपयोगी आहेत. मेंदीची पाने कडू, जखमा भरून आणनारी, मूत्रवर्धक अहेत. डोकेदुखी, कंबरदुखी, स्वासनलिका दाह केसतूट, मुखश्रोथ, उपदंश व्रण, खरूज आदींवर उपयोगी आहेत. मेंदीच्या झाडाची साल कावीळ. प्लीहावृद्धी आणि मुतखड्यावर देतात. हट्टी त्वचारोगावर, भाजण्यावर, गरम पाण्याने पोळण्यावर लावतात. जळजळणाºया तळव्यांवर मेंदीच्या ताजी पाने लिंबाच्या रसात वाटून चोळतात. नवी दिल्ली येथील सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार, त्वचारोगतज्ज्ञ तसेच विभागप्रमुख डॉ. अनिल गंजू यांच्या मते, काळ्या किंवा तपकिरी रंगाची मेंदी लावणे हानीकारक आहे. याउलट शुद्ध हिरव्या रंगाची मेंदी लावल्याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. संवेदनशील त्वचा असणाºया काही लोकांचा याला अपवाद आहे. मेंदीचे दुष्परिणाम-त्वचारोग-मेंदी जरी नैसर्गिकरित्या मिळत असली तरी, बºयाचदा कमी वेळेत अधिक गडद रंगण्यासाठी तिच्यात (पॅरा-फेनिलीनडायअमाइन)मिसळतात. मात्र हे रसायन त्वचेच्या संपर्कात आल्याने अ‍ॅलर्जी होऊ शकते. उदा.; खाज येणे, लालसर होणे, आग होणे किंवा सूज येणे.केसांचा कोरडेपणा-केसांना लावण्याची मेंदी तयार करताना त्यामध्ये अनेक घातक रासायनिक घटक मिसळल्यामुळे केस शुष्क तर होतातच पण डोक्याला खाजदेखील सुटते, कधीकधी पुरळही येऊ शकतात. डोळे लाल होणे-मेंदीमध्ये असलेल्या केमिकल्समुळे डोळ्यांशी संपर्क आल्यास डोळे लाल होतात किंवा डोळ्यांतून पाणी येऊ लागते. अशा वेळी थंड पाण्याने डोळे धुवावेत व त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.लाल पेशी फुटणे-ज्या मुलांना ग्लुकोज फॉस्पेट डिहायड्रोजनेजची कमतरता असेल त्यांच्या हातांना मेंदी लावू नये. नाहीतर त्यांच्या शरीरातील लाल पेशी फुटून शारीरिक समस्या निर्माण होतील. असे काही झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.पोट बिघडणे-मेंदी पोटात जाणे मानवी आरोग्यासाठी घातक असते. मेंदी पोटात गेल्याने पोट बिघडते म्हणून चुकूनही थोडीफार मेंदी पोटात गेली तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.मेंदीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी अशी घ्या काळजी-हातांना किंवा केसांना मेंदी अगोदर पॅचटेस्ट करुनच लावावी.मेंदीमधील रासायनिक घटकांमुळे केसांना कोरडपणा येतो, त्यासाठी मेंदी लावण्याअगोदर केसांना तेल लावावे.मेंदी लावल्यानंतर शांपू व कंडिशनरचा वापर करून केस स्वच्छ धुवावेत.मेंदी लावल्यानंतर खाज येणे, लालसर होणे, आग होणे किंवा सूज येणे आदी समस्या उद्भवू शकतात. असे आढळल्यास लगेचच हात किंवा केस धुवून त्यावर अ‍ॅलर्जी कमी करणारे औषध लावावे.