फार त्रासदायक असतात ओठांवरील पिंपल्स; असा करा बचाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 14:43 IST2019-10-15T14:37:59+5:302019-10-15T14:43:32+5:30
तुमच्या ओठांच्या आजूबाजूला त्रास देणारे किंवा प्रचंड दुखणारे पिंपल्स येतात का? या पिंपल्सनी तुम्हाला हैराण करून सोडलं आहे का?

फार त्रासदायक असतात ओठांवरील पिंपल्स; असा करा बचाव
तुमच्या ओठांच्या आजूबाजूला त्रास देणारे किंवा प्रचंड दुखणारे पिंपल्स येतात का? या पिंपल्सनी तुम्हाला हैराण करून सोडलं आहे का? तुम्ही या समस्यांचा सामना करत असाल तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही पिंपल्समुळे होणाऱ्या वेदनांपासून सुटका करून घेऊ शकता.
- सर्वात पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे, तुम्ही कितीही थकलेल्या असाल तरिही चेहऱ्यावरील मेकअप रिमूव्ह करायला विसरू नका. लिपस्टिक, टिकली, काजळ, आयलायनर चेहऱ्यावरून काढून टाका आणि मगच झोपा. जर तुम्ही मेकअप न काढता झोपलात तर तुमची त्वचा श्वास घेऊ शकणार नाही आणि निस्तेज दिसू लागेल. तसेच पिपंल्ससारख्या समस्या उद्भवू शकतात.
- चेहऱ्याच्या स्वच्छतेची काळजी घ्या. ताज्या पाण्याने कमीत कमी दिवसातून दोन वेळा आपला चेहरा स्वच्छ करा. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यासाठी माइल्ड फेसवॉशचा वापर करून धुवून टाका. त्याचबरोबर आपल्या त्वचेचा प्रकार ओळखून नाइट क्रिम अप्लाय करा.
- जेवढं शक्य असेल तेवढं नॅचरल प्रोडक्ट्सचा वापर करा. केमिकल प्रोडक्ट्स त्वचा सेन्सिटिव्ह करतात. एवढच नाहीतर अनेकदा रिअॅक्शनचं कारण बनतात. चेहऱ्यावर जेवढं शक्य असेल तेवढ्या कमी क्रिम्सचा वापर करा. तसेच शक्य असल्यास कॉटन गुलाब पाण्यामध्ये बुडवून चेहरा पुन्हा स्वच्छ करा.
- तुम्हाला तुमच्या काही सवयींमध्ये बदल करावे लागतील जंस आपल्या चेहऱ्याला सतत हात लावू नका. कारण अनेकदा आपण काम करताना वेगवेगळ्या गोष्टींच्या संपर्कात असतो. तसेच अनेक वस्तूंना स्पर्श करतो. अशावेळी चेहऱ्यावर हात लावणं किंवा ओठांना हात लावतो. अशातच पिंपल्स येण्याचा धोका वाढतो.
- जेवल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी नक्की ब्रश करा. यामुळे फक्त तुमच्या तोंडाची स्वच्छता होणार नाही तर दात आणि ओठांचीही स्वच्छता होइल.जर तुमची स्किन फार सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही आयुर्वेदिक टूथपेस्टचा वापर करू शकता.
- जर तुम्ही अप्पर लिप्सला थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करत असाल तर पार्लर हायजिनची काळजी घ्या. तुमचा चेहरा आणि वापरण्यात येणारं प्रोडक्ट दोन्ही स्वच्छ असणं गरजेचं आहे. लिप वॅक्स किंवा अप्पर लिप करण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून लोशन नक्की लावा. त्याचबरोबर हे केल्यानंतर ऑइनमेंट लावा. त्यामुळे ओपन झालेल्या पोर्समध्ये बॅक्टेरिअल इन्फेक्शन होणार नाही.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)