नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या व्यक्ती कमी जगतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 04:56 IST2016-01-16T01:08:39+5:302016-02-12T04:56:07+5:30
नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या व्यक्ती कमी जगतात... नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या व्यक्ती कमी जगतात, असे म्हटले जाते. सतत दु:खात बुडालेल्या वा निराश असलेल्या व्यक्ती सातत्याने आजारी पडतात किंवा त्यांचे आयुर्मान घटते, असेही सांगितले जाते. परंतु हे चुकीचे आहे.

नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या व्यक्ती कमी जगतात...
न राश्याच्या गर्तेत अडकलेल्या व्यक्ती कमी जगतात, असे म्हटले जाते. सतत दु:खात बुडालेल्या वा निराश असलेल्या व्यक्ती सातत्याने आजारी पडतात किंवा त्यांचे आयुर्मान घटते, असेही सांगितले जाते. परंतु हे चुकीचे आहे. सतत आनंदी असणार्या व्यक्तीनांही लवकर मृत्यू येऊ शकतो, असा दावा या संशोधकांनी केला आहे. आनंदी वा नैराश्य जीवनमानाचा मृत्यूशी काहीही संबंध नाही, असे निरीक्षण या संशोधकांनी अभ्यासातून नोंदविले आहे. दु:खी आणि तणावपूर्ण जीवनशैली विविध आजारांची लागण होण्यासाठी जबाबदार असल्याचा गैरसमज या संशोधनातून खोडून काढण्यात आला आहे.