डोळ्यांचेही सौंदर्य खुलवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 19:19 IST2017-01-12T19:19:08+5:302017-01-12T19:19:08+5:30

चेहऱ्याचे सौंदर्य डोळ्यांच्या सौंदर्यावर अवलंबून असते. यामुळे सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचेही सौंदर्य खुलवायला हवे. विशेषत: आय प्रायमर, हायलाइटर, मस्कारा आणि अशा अनेक गोष्टींच्या साह्याने आपल्या डोळ्यांचे सौंदर्य अधिक वाढविता येऊ शकते

Open your eyes! | डोळ्यांचेही सौंदर्य खुलवा !

डोळ्यांचेही सौंदर्य खुलवा !


/>चेहऱ्याचे सौंदर्य डोळ्यांच्या सौंदर्यावर अवलंबून असते. यामुळे सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचेही सौंदर्य खुलवायला हवे. विशेषत: आय प्रायमर, हायलाइटर, मस्कारा आणि अशा अनेक गोष्टींच्या साह्याने आपल्या डोळ्यांचे सौंदर्य अधिक वाढविता येऊ शकते. मग कसे वाढवाचे डोळ्यांचे सौंदर्य हे जाणून घेण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत. 



* आय प्रायमर 
आय शॅडोचा रंग गडद होण्यासाठी डोळ्यांचा मेकअप सुरू करण्यापूर्वी आय प्रायमर लावणे आवश्यक आहे. यामुळे पापण्या मऊ होतात व डोळ्यावरील मेकअप दीर्घकाळ टिकतो. 

* हायलाइटर
डोळे अधिक आकर्षक दिसण्यासाठी भुवयांवरील हाडावर हायलाइटर लावा. यामुळे डोळ्यांना सुंदर आकारही मिळतो व सुंदर दिसतात. 

* मस्कारा   
डोळ्यांना बाहेरच्या दिशेने व वरच्या बाजूने मस्कारा लावल्यास डोळे टपोरे दिसण्यास मदत होते. यामुळे आपल्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होते.

* आय लाइनर
डोळ्यांना हटके लूक देण्यासाठी आयलाइनरची भूमिका महत्त्वाची ठरते, यासाठी वेगवेगळ्या शेपच्या आयलायनरची निवड करु शकता. 

* कोल पेन्सिल
बहुतेक महिला कोल पेन्सिलचा वापर करतात, मात्र आपले डोळे बदामासारखे टपोरे असतील तरच कोल पेन्सिल लावा, अन्यथा लावू नका, नाहीतर आपले डोळे छोटे दिसतील आणि आपल्या सौंदर्यात बाधा ठरेल.

Web Title: Open your eyes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.