तेलकट त्वचेमुळे हैराण आहात?; मग 'हे' फेसपॅक नक्की ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 01:41 PM2019-09-06T13:41:28+5:302019-09-06T13:45:31+5:30

अ‍ॅक्ने किंवा पिंपल्सची समस्या कोणत्याही सुंदर चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवतात. अ‍ॅक्नेच्या समस्येमध्ये पिंपल्स चेहऱ्यासोबतच मान, पाठ, पोट आणि शरीराच्या इतर अवयवांवर येतात.

Oily and acne prone skinface packs for oily skin | तेलकट त्वचेमुळे हैराण आहात?; मग 'हे' फेसपॅक नक्की ट्राय करा!

तेलकट त्वचेमुळे हैराण आहात?; मग 'हे' फेसपॅक नक्की ट्राय करा!

Next

(Image Credit : rutinapic.pw)

अ‍ॅक्ने किंवा पिंपल्सची समस्या कोणत्याही सुंदर चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवतात. अॅक्नेच्या समस्येमध्ये पिंपल्स चेहऱ्यासोबतच मान, पाठ, पोट आणि शरीराच्या इतर अवयवांवर येतात. सर्वच प्रकारच्या त्वचेमध्ये पिंपल्सची समस्या उद्भवते. पण सर्वात जास्त समस्या ही ऑयली स्किन असणाऱ्या व्यक्तींना होते.

ऑयली स्किन असणाऱ्यांसाठी स्किन केयर टिप्स 

अ‍ॅक्नेच्या समस्येने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी त्वचेसाठी कोणतंही प्रोडक्ट खरेदी करताना सावध राहणं आवश्यक असतं. कारण स्किन केअर प्रोडक्ट्समुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते. 

द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, अॅक्ने असणाऱ्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही खास पद्धती वापरणं आवश्यक आहे. पाहूयात काही फेसपॅक जे ऑयली स्किनच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. 

ऑयली स्किनसाठी...

- मुलतानी माती गुलाब पाण्यासोबत एकत्र करा. तयार मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांसाठी ठेवून पाण्याने धुवून टाका. 

- एक मोठा चमचा मूगाची डाळ पाण्यामध्ये काही वेळासाठी भिजत ठेवा आणि पेस्ट तयार करा. यामध्ये स्मॅश केलेल्या टोमॅटोची पेस्ट एकत्र करा आणि चेहऱ्यावर लावा. 5 मिनिटापर्यंत हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर पुन्हा 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाका. 

अ‍ॅक्ने असलेले त्वचा 

- मुलतानी मातीमध्ये चंदनाची पेस्ट, रोज वॉटर आणि कडुलिंबाची सुकलेली पानांची पावडर एकत्र करून पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनी धुवून टाका. 

- मुलतानी मातीमध्ये लिंबाचा रस आणि रोज वॉटर एकत्र करून पेस्ट तयार करा आणि चेहरा, मानेवर लावा. 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: Oily and acne prone skinface packs for oily skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.