मोतीबिंदू घालवण्यासाठी नवे औषध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 04:47 IST2016-01-16T01:12:23+5:302016-02-08T04:47:32+5:30
भारतीय वंशाच्या संशोधकासह काही संशोधकांनी मोतीबिंदू नष्ट करण्यासाठी डोळ्यात टाकण्याचे ...

मोतीबिंदू घालवण्यासाठी नवे औषध
भ रतीय वंशाच्या संशोधकासह काही संशोधकांनी मोतीबिंदू नष्ट करण्यासाठी डोळ्यात टाकण्याचे औषध शोधून काढले आहे. मोतीबिंदूमुळे दृष्टी जात असते. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करता येत असली तरी ती तुलनेने खर्चिक असते व अनेक लोक विकसनशील देशात उपचाराअभावी आंधळे होतात, असे संशोधकांचे मत आहे. मोतीबिंदू हा जास्त वयात होणारा नेत्ररोग असून काही प्रथिनांचे कार्य बिघडल्याने तो होतो. पार्किसन्सन म्हणजे कंपवात व अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंशासारखाच तो विशिष्ट वयानंतर होतो.