शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

कधी फुलात रंगले !!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2016 12:38 PM

स्वत:चा अल्बम असावा, असे प्रत्येक गायकाचे आणि गीतकाराचेही स्वप्न असते, मात्र हा प्रवास हवा तसा सोपा नसतो

-रवींद्र मोरे खांदेशाची सांगीतिक वाटचालस्वत:चा अल्बम असावा, असे प्रत्येक गायकाचे आणि गीतकाराचेही स्वप्न असते, मात्र हा प्रवास हवा तसा सोपा नसतो. असेच स्वप्न पाहिले खांदेश आणि महाराष्ट्राभरही  नाव असलेल्या जळगाव येथील कवयित्री डॉ. संगीता म्हसकर यांनी जीद्द व चिकाटीच्या जोरावर लहानपणापासूनचा संगीतमय प्रवास करीत त्यांचा ‘कधी फुलात रंगले’ हा पहिलाच अल्बम, ज्यात त्यांनी स्वत:च्या गजल स्वत:च्याच आवाजात गायल्या आहेत. आणि हा अल्बम लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. खांदेशातील नवोदित गायक-गायिकांना एक प्रेरणादायी अशी ही एक सांगीतिक वाटचाल आजच्या लेखात आपण संगीता म्हसकर यांच्यामाध्यमातून लक्षात आणून देणार आहोत. संगीता म्हसकर यांचे वडील प्रा. एन.व्ही. पटवारी हे गायक असल्याने त्यांच्या घरातच संगीतमय वातावरण होते. त्यामुळे लहानपणापासूनच शास्त्रीय संगीतातले निराकार सूर त्यांना मोह घालायचे. शिवाय शब्दार्थ घेऊन येणारे सुगम संगीतातले सूरही तितकेच ओढ लावायचे. म्हसकर यांनी तेव्हापासूनच लयबद्ध क विता लिहायला सुरुवात केली होती. मात्र राहत असलेल्या ठिकाणी संगीत-साहित्य या गोष्टींना फारसा वाव नव्हता. तरीही शास्त्रीय संगीताचे लहान-मोठे कार्यक्रम, विविध स्पर्धा यात सहभाग आवर्जून असायचा. सोबतच आकाशवाणीतही काम करीत होत्या. अशातच सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीत दिग्दर्शनात अहिराणी चित्रपटासाठी एक गाणे गाण्याची संधी मिळाली. पुढील वाटचालीसाठी पत्की यांनी मुंबईला येण्याचे सुचविले. मात्र घरातील अडचणींमुळे त्या जाऊ शकल्या नाही. पुढे लग्नानंतर संगीता म्हसकर यांचे पती डॉ. श्रीकांत म्हसकर यांच्या आग्रहाने संगीत क्षेत्रात पीएचडी प्राप्त केली. खांदेशाची सांगीतिक वाटचालसंगीत क्षेत्रातही खांदेशाची वाटचाल प्राचीन काळापासून उल्लेखनीय ठरली आहे. परंतु याची आजपर्यंत एकत्रितरीत्या कु ठेही नोंद केलेली नाही. खांदेशाच्या सांगीतिक वाटचालीची नोंद घेणारे संगीता म्हसकर लिखित या पुस्तकात खान्देशाची १८५० पूर्व काळातील सांस्कृतिक वाटचाल त्याचप्रमाणे १८५० ते २००० या कालखंडातील सांस्कृतिक वाटचाल लक्षात घेतलेली आहे. तसेच या भागातील सांगीतिक क्षेत्राचा आढावा घेताना येथील कलावंतांच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाची नोंद केलेली आहे. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत अशा दोन्ही प्रवाहांचा विचार या पुस्तकात करण्यात आलेला आहे. मराठीत स्वत:च्या कविता गाणाऱ्या कवयित्री फार नाहीतकविवर्य ना.धो.महानोर यांच्या सोबत म्हसकर यांनी अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. त्यात संगीत व काव्य मैफिलींचे सूत्रसंचालन, वृत्तांत लेखन केले. कवी अरुण म्हात्रे यांच्या सोबत ठाण्यात आणि जळगावात केला असता त्यांनी म्हसकर यांना सांगितले की, ‘मराठीत स्वत:च्या कविता गाणाऱ्या कवयित्री फार नाहीत, तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.’ त्यांच्या या शब्दांनी म्हसकर यांच्या कामाला एकप्रकारे दिशा मिळाली. यशस्वी वाटचालीतून अल्बम तयार करण्याची प्रेरणागझल संग्रहानंतर म्हसकर यांना अल्बम निर्मितीची प्रेरणा मिळाली. आणि गझलकार दिलीप पांढरपट्टे आणि संगीतकार दिनेश अर्जूना यांनी त्यांना या प्रोजेक्टसाठी संपूर्ण सहकार्य करीत त्यांचा ‘कधी फुलात रंगले’ हा पहिलाच अल्बमची निर्मिती झाली. या अल्बम मधील सर्वच गझल सर्वच गझल रसिकांना  आवडतील. संगीतकार दिनेश अर्जूना यांनी या गझलांना संगीत देताना परंपरा आणि नावीण्य यांचा संगम घडविला आहे.  आकाशवाणीवरही आवाजाची जादूआकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी हेमंत सपकाळे यांनी म्हसकर यांच्या अनेक कविता स्वरबद्ध करून आकाशवाणीवर प्रसारित केल्या आहेत. त्यातील बºयाच रचना ह्या त्यांच्याच आवाजात होत्या.