महिलांच्या संगतीत जास्त जेवतात पुरुष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:39 IST2016-01-16T01:13:35+5:302016-02-07T12:39:31+5:30
एका रंजक सर्वेक्षणातून समोर आले की, जर पुरुषांच्या सोबतीला कुणी महिला असेल तर त्याचा आहार आपोआप वाढतो.

महिलांच्या संगतीत जास्त जेवतात पुरुष
ए ा रंजक सर्वेक्षणातून समोर आले की, जर पुरुषांच्या सोबतीला कुणी महिला असेल तर त्याचा आहार आपोआप वाढतो. मुलींच्या संगतीमध्ये मुलं जास्त जेवतात. संशोधक म्हणतात की, तुम्ही जर पुरुष असाल तर तुमच्या सोबत जेवताना पुरुष आहेत की महिला याचा तुमच्या भुकेवर परिणाम होतो.
न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापीठाच्या संशोधकांनी एका इटालियन रेस्ट्राँमध्ये जेवण करणार्या १0५ प्रौढ व्यक्तींचा दोन आठवडे अभ्यास केला. यावेळी पुरुष किती पिझ्झा स्लाईसेस आणि किती वाट्या सलाद खातात याची नोंद करण्यात आली. तसेच प्रत्येक जण सोबत महिला आणि की पुरुष हे देखील लिहिले.
जेवण झाल्यावर प्रत्येकाला जेवणाबद्दल आणि जेवताना येणार्या अनुभवांबद्दल विचारण्यात आले. त्यातून असे दिसून आले की, ज्या पुरुषांनी महिलांसोबत जेवण केले त्यांनी इतर पुरुषांच्या (ज्यांनी केवळ पुरुषांसोबत जेवण केले) तुलनेत ९३ टक्के जास्त पिझ्झा आणि ८६ टक्के अधिक सलाद खाले. त्यामुळे जर तुम्ही डाएट वर असाल तर डेट वर जाणे टाळणेच बरे.