'या' कठीण एक्सरसाइजने स्वत:ला फिट आणि हिट ठेवते मलायका, बघा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 11:25 IST2018-12-18T11:22:25+5:302018-12-18T11:25:25+5:30

बॉलिवूडची सर्वात हिट आयटम डान्सर आणि हॉट अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते.

Malaika Arora fitness secret this cardio exercises, Watch Video | 'या' कठीण एक्सरसाइजने स्वत:ला फिट आणि हिट ठेवते मलायका, बघा व्हिडीओ

'या' कठीण एक्सरसाइजने स्वत:ला फिट आणि हिट ठेवते मलायका, बघा व्हिडीओ

बॉलिवूडची सर्वात हिट आयटम डान्सर आणि हॉट अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. मलायका अनेकांसाठी एक फॅशन आयकॉन असून तिची स्टाइलही अनेकजण फॉलो करतात. पण इतकं वय होऊनह मलायका इतकी स्लिम आणि फिट कशी दिसते हे कोडं सर्वांनाच पडलेलं असतं. पण मलायका यासाठी किती मेहनत घेते याचे काही व्हिडीओ तिने सोशल मीडियात शेअर केले आहेत. 

चाळीशी पार करुनही मलायका तिच्यापेक्षा वयाने लहान सर्वच अभिनेत्रींना फिटनेसबाबत टक्कर देते. पण हे मलायकासाठी अजिबातच सोपं नाहीये. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर काही वर्कआउट करतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. 

फिटनेसबाबत मलायका कोणतीही तडजोड करत नाही. ती फिटनेसबाबत फारच सिरीअस आहे. जिम आणि योगा दोन्ही प्रकारचे अभ्यास करण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. मलायकाने शेअर केलेल्या व्हिडीओत ती कार्डियो करताना दिसत आहे. 

मलायकाने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, ही कार्डियोची सर्वात कठीण एक्सरसाइज आहे. पण मी फार आनंदी आहे की मी हे करत आहे. ही एक्सरसाइज केल्यावर फार चांगलं वाटत आहे. हे केल्यावर मला मी अशक्य गोष्ट मिळवल्याचा आनंद होत आहे. 

Web Title: Malaika Arora fitness secret this cardio exercises, Watch Video