घरगुती उपाय करा अन् स्किन उजाळा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 18:19 IST2017-01-20T18:18:05+5:302017-01-20T18:19:48+5:30
काही घरगुती उपाय केलेत तर पार्लरमध्ये जाण्याची गरजच भासणार नाही आणि पैसेदेखील वाचतील शिवाय सुंदरपण दिसाल. आजच्या सदरात घरगुती उपायांनी स्किन कशी उजाळणार याविषयी जाणूून घेऊयात.

घरगुती उपाय करा अन् स्किन उजाळा !
आपल्या चेहऱ्याची स्किन चमकदार असावी यासाठी प्रत्येक महिला काळजी घेत असते. त्यासाठी वेळोवेळी फेशियलदेखील करतात. मात्र, काही वेळेस आपला चेहरा उजाळण्यासाठी होम केयरचीसुद्धा आवश्यकता असते. जर आपण दर आठवड्याला आपल्या त्वचेसाठी थोडा वेळ काढून काही घरगुती उपाय केलेत तर पार्लरमध्ये जाण्याची गरजच भासणार नाही आणि पैसेदेखील वाचतील शिवाय सुंदरपण दिसाल. आजच्या सदरात घरगुती उपायांनी स्किन कशी उजाळणार याविषयी जाणूून घेऊयात.
* त्वचेची स्वच्छता करा
स्किन उजाळण्यासाठी सर्वप्रथम त्वचेची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी आपला चेहरा स्वच्छ ठेवायला हवा. यामुळे फेशियलदेखील चांगले काम करते. जर आपण क्लींजिंग मिल्क, बेबी आॅइल किंवा मेकअप केलेला असेल तर चेहऱ्याच्या स्वच्छतेसाठी मेकअप रिमूव्हरचा प्रयोगही करु शकता. वरीलपैकी कोणतेही प्रोडक्ट कापसाला लावून चेहरा स्वच्छ करा. एकदा चांगल्या प्रकारे चेहरा स्वच्छ केल्यावर पाण्याने धुवून घ्या.
* स्क्रब करा
चेहऱ्याची चमक वाढविण्यासाठी स्क्रब करु शकता. यासाठी घरगुती किंवा सौम्य रेडिमेड स्क्रबचा वापर करु शकता. चेहऱ्यावर खूप मोठे ब्लॅक हेड्स असल्यास स्क्रब करण्याअगोदर पाण्यात एक रुमाल भिजवून पिळून घ्या आणि तो थोडा वेळ चेहऱ्यावर ठेवा. वाफ तुमच्या त्वचेच्या रोमछिद्रांना उघडेल आणि यामुळे स्क्रब चांगल्या प्रकारे होईल याशिवाय आपले बोट गोल-गोल फिरवत तीन मिनिटे स्क्रब करा. यामुळे चेहऱ्यावरील पेशी अॅक्टिव्ह होतात आणि चेहरा उजाळण्यास मदत होते.
* टोनर केयर
त्वचेची स्वच्छता आणि स्क्रब केल्यानंतर रोमछिद्र उघडे होतात. ती छिदे्र बंद करणेदेखील गरजेचे असतात. यासाठी त्यांना एका चांगल्या टोनरची केयर मिळावी. त्यासाठी आपर रोज वापरत असलेले टोनर किंवा गुलाब जर कॉटन बॉलला लावून चेहऱ्यावर लावा. तुम्ही गुलाब जल किंवा थंड केलेला ग्रीन टीचा स्प्रे सुद्धा लावू शकता.
* योग्य फेस पॅकची निवड
आता चेहऱ्याला पोषण देण्यासाठी आपल्या स्किनला सूट करणाऱ्या योग्य फेसपॅकचा प्रयोग करु शकता. यासाठी १५ मिनिट चेहऱ्यावर पॅक लावा. शिवाय यावेळी तुमच्या डोळ्यावर काकडीचे स्लाइसेस ठेवू शकता.
* स्किन मसाज
वरील स्टेप्स केल्यानंतर आता वेळ आहे चेहऱ्याच्या स्किनचे ब्लड सर्क्युलेशन वाढविण्याची. यासाठी स्किन मसाज हा खूप चांगला पर्याय आहे. मसाज केल्यानंतर वरील चार स्टेप्समध्ये फेस पॅकने जो टॉक्सिन तुमच्या चेहऱ्यावर जमला आहे. तो यामुळे बाहेर निघेल. यासाठी तुम्ही आॅलिव्ह किंवा अलमंड आॅयल सारखा हल्का स्किन आॅयल लावू शकता. तुम्ही तुमच्या आवडीची फेस क्रीम लावली तरी चालेल. कमीत कमी ५ मिनिट लहान-लहान गोलाकार पद्धतीने वापरून वरुन खालच्या दिशेने मसाज करा.