कार्बाेहायड्रेटमुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 04:52 IST2016-03-10T11:47:32+5:302016-03-10T04:52:56+5:30

कार्बोहायड्रेटमुळे फुफ्फुसाचा कॅन्सर (कर्करोग) होण्याचा धोका वाढतो.

Lung cancer risk due to carbohydrate | कार्बाेहायड्रेटमुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका

कार्बाेहायड्रेटमुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका

चून निराश झालात? पण हे खरे आहे. आपल्याला आवडणाऱ्या कितीतरी खाद्यापदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट (कार्बोदके) असतात. आरोग्यासाठी ही कार्बोदके फार धोकादायक असतात. त्यात आणखी एक भर म्हणजे कार्बोहायड्रेटमुळे फुफ्फुसाचा कॅन्सर (कर्करोग) होण्याचा धोका वाढतो.

टेक्सास विद्यापीठातील एमडी अँडरसन कॅन्सर सेंटरतर्फे करण्यात आलेल्या संशोधनातून असे सिद्ध झाले की, कार्बोहायड्रेटचे आहारात अतिप्रमाणात सामावेश असल्यास लंग (फुफ्फुस) कॅन्सर होण्याची शक्यता ४९ टक्क्यांनी वाढते. म्हणजे जवळपास फिफ्टी-फिफ्टी चान्सच म्हण ना.

ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असणारे पदार्थ (व्हाईट ब्रेड, भात, बटाटे, इन्स्टंट ओटमिल इ.) आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत असतात. त्यातून निर्माण होणारे प्रोटिन हे लंग कॅन्सरशी निगडित असते.

कार्बोदकांची प्रतावारी  मोजण्याचे परिणाम म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. एक ते शंभर या प्रमाणात ही प्रतवारी मोजण्यात येते. जी कार्बोदके रक्तात सर्वात वेगाने संमिश्रीत होतात त्यांना ग्लायसेमिक इंडेक्सवर शंभर गुण दिले जातात. 

white bread

अधिक ग्लायसेमिक इंडेक्स असणारा आहार घेणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सर सेल तयार होण्याची शक्यता ९२ टक्के जास्त असते. मग तुम्ही कितीही कमी किंवा जास्त खात असाल तरी.

Web Title: Lung cancer risk due to carbohydrate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.