डाग आणि पुळ्यांनी हैराण असाल, तर पार्लरशिवाय डॅमेज त्वचा डिटॉक्स करण्याची 'ही' ट्रिक वापरा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 14:52 IST2020-02-16T14:44:38+5:302020-02-16T14:52:17+5:30
सुंदर आणि हेल्दी स्कीन साठी महिला खूप प्रयत्न करत असतात.

डाग आणि पुळ्यांनी हैराण असाल, तर पार्लरशिवाय डॅमेज त्वचा डिटॉक्स करण्याची 'ही' ट्रिक वापरा!
(image credit- be beautiful)
सुंदर आणि हेल्दी स्कीन साठी महिला खूप प्रयत्न करत असतात. बाजारात मिळणारे वेगवेगळ्या कंपन्यांचे केमिकलयुक्त क्रिम आणि इतर सौंदर्य प्रसाधनं वापरल्यामुळे त्वचा खराब होत असते. पण तुम्हाला माहीत आहे का चांगली आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी तुमचं पोट आणि पचनक्रियेशी निगडीत सगळया गोष्टी व्यवस्थित असणं गरजेचं असतं. जितकं तुमचं पोट साफ असेल तेवढच त्वचेवर कमी त्रास उद्भवतो.
(image credit- heathline)
तुम्ही अनेकदा पार्लरमध्ये गेल्यानंतर फेशियल करत असताना स्टिमरचा वापर करून त्वचेवर वाफ घेत असता. त्यामुळे चेहरा डिटॉक्स होत असतो. पण प्रत्येकवेळी पार्लरला जाणं शक्य नसतं. आज आम्ही तुम्हाला स्कीन डिटॉक्स करण्याचे उपाय सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही आपली त्वचा चांगली ठेवू शकता.
तुमच्या त्वचेला डिटॉक्स करण्याची गरज आहे की नाही कसं ओळखालं?
(image credit- aromas vitas)
जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुमचा चेहरा सुद्धा तजेलदार दिसत असतो. त्यामुळे सुज येणे, जळजळ होणे, ब्रेकआऊट आणि अतिरिक्त तेल जमा होणे, पुळ्या येणे. चेहरा प्रमाणापेक्षा जास्त कोरडा होणे असा त्रास उद्भवत असतो. तुम्हाला सुद्धा अशा समस्या जाणवत असतील तर त्वचेला डिटॉक्स करण्याची आवश्यकता आहे.
त्वचेवर गरम पाण्याची वाफ घ्या
तुमचा चेहरा किंवा शरीराला वाफ देण्याने शरीरातील टॉक्सीन्स बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळो त्वचेची छिद्र ओपन होत असतात. एका भांड्यात पाणी गरम करून टॉवेलने झाकून वाफ घ्या. त्यानंतर चेहरा आणि मानेला घाम आल्यानंतर स्वच्छ कापडाचा वापर करून चेहरा पुसून घ्याय
हायड्रेट करा
पाणी शरीरासाठी आणि त्वचेवरील समस्येसाठी उत्तम उपाय आहे. जे लोक खूप पाणी पितात त्यांची स्किन हायड्रेट राहते. मुत्राद्वारे शरीरातील नको असलेले आणि घातक पदार्थ बाहेर पडत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या. शरीराला फायबर्सची सुद्धा गरज असते. त्यासाठी ज्यूसचा आहारात समावेश करा. रोज असं केल्यास त्वचेला पोषण मिळत असतं. जेणेकरून शरीरातील विषारी घटक जास्त काळ राहणार नाही.
डिटॉक्स डाइट फॉलो करा
आपण जे काही खात असतो. त्याचा आपल्या त्वचेवर आणि शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे चॉकलेट, मिल्कशेक यांसारखे पदार्थ तुम्हाला खायला आवडत असतील तर त्यांचे सेवन शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्यासाठी आहारात ताजी फळं, भाज्या यांचा समावेश करा. ( हे पण वाचा-केस वाढण्याची वाट बघत असाल, तर आल्याचा वापर तुमची लांब केसांची इच्छा करेल पूर्ण)
घाम जास्त येऊ द्या
आपल्या शरीराला येणारा घाम संपूर्ण शरीराला डिटॉक्स करत असतो. त्यामुळे व्यायाम दररोज करा. जेणेकरून तुम्हाला घाम येईल आणि शरीरातील टॉक्सिन्स निघून जातील. त्यासाठी योगा किंवा कार्डीओ व्यायाम करा. त्यामुळे पिंपल्स येण्याचं प्रमाण सुद्धा कमी होईल. ( हे पण वाचा-सुंदर त्वचेसाठी सर्वात बेस्ट आयुर्वेदिक उपाय चंदनाचं तेल, याचे फायदे वाचाल तर सर्व ब्युटी प्रॉडक्ट्स वापरणं सोडाल!)