केस वाढण्याची वाट बघत असाल, तर आल्याचा वापर तुमची लांब केसांची इच्छा करेल पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 01:28 PM2020-02-12T13:28:25+5:302020-02-12T13:29:53+5:30

आल्याला सुपरफुड म्हटलं जातं.

How to get long and shiny hairs by using ginger | केस वाढण्याची वाट बघत असाल, तर आल्याचा वापर तुमची लांब केसांची इच्छा करेल पूर्ण

केस वाढण्याची वाट बघत असाल, तर आल्याचा वापर तुमची लांब केसांची इच्छा करेल पूर्ण

Next

आल्याला सुपरफुड म्हटलं जातं. आपल्या किचनमध्ये सर्रास वापरल्या जात असलेल्या पदार्थांमध्ये आल्याचा समावेश होतो.  अन्नाचे व्यवस्थित पचन होण्यासाठी, सर्दी खोकल्याच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी आल्याचा वापर केला जातो.  पण तुम्हाला माहीत आहे का आल्याचे आरोग्याला जसे अनेक फायदे आहेत. त्याचप्रमाणे सौंदर्याच्या दृष्टीने सुद्धा आहे. केमिक्लसयुक्त थेरेपी आणि ब्यूटी ट्रिटमेंट घेण्यापेक्षा जर तुम्ही आल्याचा वापर केला तर लांबसडक चांगले केस मिळवू शकता. 

केस गळण्याची समस्या दूर होते

आलं  तुमच्या स्काल्पला  व्यवस्थित ठेवून केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरत असते.  आल्यामध्ये सर्वाधिक मिनरल्स आणि महत्त्वाची विटामिन्स असतात. तसंच आरोग्य निरोगी राखण्यासाठी यामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स आणि अँटिइन्फ्लेमेटरी घटकांचा जास्त उपयोग होत असतो.  त्यामुळे केस गळती थांबते.

 केसांमधिल कोंडा दूर करण्यासाठी

कोंड्यामुळे केस खराब होतात. केसांमधिल कोंड्याचे कण चेहरा आणि त्वचेवर पडल्यास त्वचेवर पुळ्या येतात. आल्याच्या रसाने तुमच्या केसातील कोंडा निघून जाण्यास मदत होते. यामध्ये असणाऱ्या अँटिसेप्टिक घटकांमुळे केसांमध्ये कोंडा राहात नाही आणि स्काल्प स्वच्छ होण्यासही मदत होते. केसातील कोरडेपणा आणि कोंडा घालवण्यासाठी याचा उपयोग होतो.

केसांची वाढ

आल्यामुळे रक्तप्रवाह योग्य होतो. त्यामुळे केसांची वाढही चांगली होते. तसंच नियमित तुम्ही केसांना आल्याचं तेल लावलं आणि आल्याचा रस वापरलात तर तुमच्या केसांना एक वेगळी चमक मिळते आणि केसगळती रोखल्यामुळे केसांची वाढही चांगली होते. तसंच यातील अँटिसेप्टिक गुणधर्मामुळे सहसा केसांमध्ये कोंडा होत नाही आणि केस व्यवस्थित राखले जातात. ( हे पण वाचा-साबणाची वडी की लिक्विड सोप? त्वचेसाठी काय असतं अधिक फायदेशीर)

केसांची मुळापासून वाढ होऊन अगदी केसांना मुळापर्यंत हे तेल पोषण देतं. आल्याच्या तेलामध्ये असणारे पोषक घटक हे केवळ केसांची वाढच नाही करत तर तुमच्या शरीरातील रक्तप्रवाहदेखील चांगला करतात. तसंच तुमचे केस अधिक सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठीही आल्याच्या तेलाचा वापर करता येतो.

आल्याचा असा करा वापर

किसलेलं आलं, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि ३ चमचे तिळाचं तेल घेऊन वाटून मिक्स करा.ही पेस्ट तुमच्या स्काल्पला लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.  अर्धा तास हे तसंच ठेवा आणि नंतर नियमित वापरला जाणाऱ्या शँपूने केस धुवा. हा प्रयोग आठवडाभर केल्यास फरक दिसून येईल. ( हे पण वाचा-लिपस्टिक ऑनलाईन खरेदी करायचीय?, मग 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी)

Web Title: How to get long and shiny hairs by using ginger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.