कोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 12:04 IST2019-08-20T11:49:58+5:302019-08-20T12:04:05+5:30
काही लोकांची त्वचा फारच कोरडी असते तर काही लोकांची त्वचा तेलकट असते. तेलकट त्वचा असलेल्या लोकांना मात्र त्यांच्या त्वचेची फारच चिंता लागलेली असते.

कोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्!
(Image Credit : elemis.com)
काही लोकांची त्वचा फारच कोरडी असते तर काही लोकांची त्वचा तेलकट असते. तेलकट त्वचा असलेल्या लोकांना मात्र त्यांच्या त्वचेची फारच चिंता लागलेली असते. पण प्रत्येक प्रकारच्या त्वचेचे काही फायदेही असतात. जे फार कमी लोकांना माहीत असतात. कोरडी त्वचा असेल तर हिवाळ्यात फार जास्त समस्या होता, त्याचप्रमाणे तेलकट त्वचा असलेल्या लोकांना उन्हाळ्यात समस्यांचा सामना करावा लागतो. अशात एक्सपर्ट्स सांगतात की, कोरड्या त्वचेपेक्षा तेलकट त्वचा अधिक फायदेशीर असते. कशी ते जाणून घेऊया....
(Image Credit : Social Media)
त्वचा कोरडी असो वा तेलकट असो त्वचा फार संवेदनशील असते. त्यामुळे त्वचेवर बाहेरील गोष्टींचा प्रभाव फार लवकर बघायला मिळतो. तेलकट त्वचेवर एक नैसर्गिक चमक बघायला मिळते. तसेच रखरखीत किंवा कोरड्या त्वचेच्या तुलनेत तेलकट त्वचेवर सुरकुत्या कमी दिसतात आणि वाढत्या वयाचा प्रभावही उशीरा दिसतो. असेच आणखीही काही फायदे आहेत.
दिवसभर चमक कायम असते
चेहरा पुन्हा पुन्हा धुतल्याने चेहऱ्यावर चमक येते. पण तेलकट त्वचा एकदा धुतल्याने दिवसभर चमक कायम राहते. त्वचेमध्ये चमक आणि ओलावा कायम राहत असल्याने त्वचा नेहमी तरूण दिसते. त्यामुळे तेलकट त्वचेवर वृद्धत्व उशीरा दिसू लागतं.
सुरकुत्याही दिसत नाहीत
ज्या लोकांची त्वचा तेलकट असते, त्यांच्यावर वाढत्या वयाचा कोणताही प्रभाव बघायला मिळत नाही. सुरकुत्याही नसतात. कारण तेलकट त्वचेवर नेहमी चमक आणि ओलावा असतो.
प्रत्येक वातावरणासाठी परफेक्ट
तेलकट त्वचेमध्ये नैसर्गिक रूपाने व्हिटॅमिन ई आढळतं. जे त्वचेसाठी एक नैसर्गिक अॅंटी-ऑक्सिडेंटच्या रूपात काम करतं. यामुळे सूर्याची प्रखर किरणे, प्रदूषण आणि त्वचेच्या रोगांपासूनही बचाव होतो.
मेकअप करणं सोपं
तेलकट त्वचा मुलायम आणि ओलसर असते. त्यामुळे मेकअप करण्यासाठी हा योग्य कॅनव्हास असतो. कोरड्या त्वचेच्या तुलनेत त्वचेवर मेकअप योग्यप्रकारे केलं जाऊ शकतं.