फक्त चांगला आहार पुरेसा नाही..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 05:57 IST2016-01-16T01:05:33+5:302016-02-11T05:57:42+5:30

फक्त चांगला आहार पुरेसा नाही..! आपला आहार सकस आणि पौष्टिक असावा. लहान मुलांना भाज्या आणि फळे खायला द्यावी असे सांगितले जाते. मात्र नव्या रिसर्चनुसार केवळ चांगला आहार घेणे पुरेसे नाही.

Just good diet is not enough ..! | फक्त चांगला आहार पुरेसा नाही..!

फक्त चांगला आहार पुरेसा नाही..!

ला आहार सकस आणि पौष्टिक असावा. लहान मुलांना भाज्या आणि फळे खायला द्यावी असे सांगितले जाते. मात्र नव्या रिसर्चनुसार केवळ चांगला आहार घेणे पुरेसे नाही. जी मुलं गाजर, सफरचंदासारखी पौष्टिक फळे खातात, तीचं मुलं चॉकलेट, चिप्स आणि बर्गर यांसारखे जंक फुडही खातात. त्यामुळे चांगल्या आहाराबरोबरच निकृष्ट आणि हानीकारक आहार टाळण्याकडेही लक्ष देण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे. या संशोधनात आढळून आले की, रोज दूध, भाज्या आणि फळे खाणारी मुलंदेखील जास्त साखर आणि मीठ असलेले अनहेल्थी अन्न खातात. ओहायओ स्टेट विद्यापीठातील फिलिस पिरी यांनी माहिती दिली की, लोकांचा असा गैरसमज आहे केवळ चांगला आहार घेण्याच्या सवयीमुळे निकृष्ट आहार घेण्याचे प्रमाण कमी होते. लहान मुलांतील लठ्ठपणाच्या समस्येला रोखण्यासाठी फक्त चांगले अन्न खाण्याकडे लक्ष दिले जाते आणि जंक फुड टाळायला हवे याकडे दुर्लक्ष केले जाते.
प्रशिक्षित तज्ज्ञांनी दोन ते पाच वर्षांच्या ३५७ मुलांच्या पालकांकडून त्यांच्या मुलांनी मागच्या आठवड्यात काही विशिष्ट पदार्थ किती वेळा खाल्ले याची माहिती गोळा केली. त्यातून असे दिसून आले की, आध्र्यापेक्षा जास्त मुलं दिवसातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा फळे खातात. पण सगळ्याच वयाची मुलं जी फळे आणि भाज्या खातात ती अनहेल्थी अन्नही तितक्याच प्रमाणात खातात. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो.

Web Title: Just good diet is not enough ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.