व्यायामामुळे वाढते मेंदूचे वय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:37 IST2016-01-16T01:12:42+5:302016-02-06T11:37:39+5:30

प्रत्येक डॉक्टर, हेल्थ एक्सपर्ट आणि आईवडील आपल्याला व्यायाम कर...

Increased brain age due to exercise | व्यायामामुळे वाढते मेंदूचे वय

व्यायामामुळे वाढते मेंदूचे वय

रत्येक डॉक्टर, हेल्थ एक्सपर्ट आणि आईवडील आपल्याला व्यायाम कर म्हणून सांगत असतात. 'आरोग्यम धन संपदा'चे डोसही पाजले जातात. व्यायामाने आपले शरीर निरोगी आणि ठणठणित राहते मात्र आता संशोधकांना असे आढळून आले की व्यायामामुळे वयानुसार कमी होणारी मेंदूची कार्यक्षमता रोखली जाऊ शकते. लॅबमध्ये उंदरावर करण्यात आलेल्या प्रयोगातून हा निष्कर्ष निघाला आहे.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या या प्रयोगात असे दिसून आले की व्यायामामुळे एसआयआरटी-३ नावाच्या एन्झायमची पातळी मोठय़ा प्रमाणावर वाढते. हे स्पेशल एन्झायम मेंदूची कार्यक्षमता कमी करणार्‍या स्ट्रेसर्सपासून रक्षा करू न मेंदूची सेल एनर्जी घटण्यापासून रोखते. 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंग'चे मार्क मॅटसन यांच्या मार्गदर्शनात हे संशोधन करण्यात आले आहे. यावेळी प्रयोगात नव्या पद्धतीचे अँनिमल मॉडेल तयार करण्यात आले होते ज्याद्वारे तणावाच्या विरोधात मेंदूची क्षमता कशी वाढवता येईल याचा शोध घेण्यात आला.

Web Title: Increased brain age due to exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.