‘ब’ जीवनसत्त्वाचा आहारात समावेश करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 05:51 IST2016-03-13T12:51:55+5:302016-03-13T05:51:55+5:30

‘ब’ जीवनसत्त्व असलेल्या आहाराचा समावेश करणे फायद्याची असते. 

Include the 'B' vitamin supplement | ‘ब’ जीवनसत्त्वाचा आहारात समावेश करा

‘ब’ जीवनसत्त्वाचा आहारात समावेश करा

ong>जखमा भरून न येणे, सोलपटलेले व्रण, जखमा चिघळणे, मानसिक खिन्नता, मिरगी-फेफरे, थकवा, निरुत्साह, केसांसंबंधीचे विकार, प्रतिकारशक्तीत येणारी घट, प्रजनन संबंधी विकार, शिशाचं विष पोटातच राहणे आणि त्याचे नीट उत्सर्जन न होणे,मज्जातंतू संबंधीचे विकार, दुभंग व्यक्तिमत्त्व, डोळय़ांसंबंधीचे विकार, बाळंत स्त्रियांत दूध आटणे, काचबिंदू आदी विकार ‘ब’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतात. अशावेळी ‘ब’ जीवनसत्त्व असलेल्या आहाराचा समावेश करणे फायद्याची असते. 

फळे : संत्री, सफरचंद, प्रून्स, कॅण्टॅलूप, जरदाळू, आलुबुखार, अक्रोड.

रस, पेयं आणि सरबते : ढोबळय़ा मिरचीचे रंगीबेरंगी प्रकार, हिरव्या पालेभाज्या, दूध आणि त्याचे प्रकार, गाजर आणि टोमॅटो.

सूप आणि भाज्या : मोड आलेली कडधान्यं, हिरव्या पालेभाज्या, अळंबी, ब्रोकोली, स्क्वॅश, पालक, टोमॅटो, मका, जलजन्य वनस्पती, कोशिंबिरी, ढोबळी मिरची, टोमॅटो, पालेभाज्या  यीस्ट, मोड आलेली धान्यं, ढोबळय़ा मिरच्या, फेसलेली मोहरी, रताळे, बटाटा.  मोड आलेले मूग, ढोबळी मिरची, अळंबी, कोंडय़ासह तांदूळ, मोड आलेले शेंगदाणे, ओट्स, मोहरी, पिस्ते, घरगुती चीज, किण्वन यीस्ट, बेकरी यीस्ट, टोरुला (यीस्टचा प्रकार), रताळं, कडधान्यं आणि खजूर यांचा आहारात समावेश असवा. 

Web Title: Include the 'B' vitamin supplement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.