सतत काम केल्यानंतरही फ्रेश दिसायचं असेल तर वापरा 'या' टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 14:55 IST2019-01-21T14:55:37+5:302019-01-21T14:55:44+5:30
कामाचा सतत वाढता ताण तुमच्या चेहऱ्यावर आणि हालचालीवर दिसू लागतो. त्यामुळे नक्कीच कुणालाही कामातून ब्रेक हवा असतो.

सतत काम केल्यानंतरही फ्रेश दिसायचं असेल तर वापरा 'या' टिप्स!
कामाचा सतत वाढता ताण तुमच्या चेहऱ्यावर आणि हालचालीवर दिसू लागतो. त्यामुळे नक्कीच कुणालाही कामातून ब्रेक हवा असतो. पण ब्रेक घेणं इतकही सोपं नाहीये. त्यामुळे असं काही करणं फायदेशीर ठरेल ज्यामुळे तुम्ही सतत फ्रेश फिल कराल. आता तुम्हाल ते कसं? तर आम्ही तुम्हाला सतत फ्रेश राहता येईल याच्या काही टिप्स सांगणार आहोत.
म्युझिक ऐका -
एका रिसर्चनुसार, काम करत असताना म्युझिक ऐकल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि ज्यामुळे मेंदू एकाग्र होतो. याचा प्रभाव व्यक्तीच्या मूडवर पडतो आणि तो अधिक चांगल्याप्रकारे काम करू शकतो. त्यामुळे शक्य असेल तर काम करताना म्युझिक ऐकायची सवय लावा.
फेशिअल वाइप्समुळे चांगला लूक -
(Image Credit : www.allure.com)
मुलींचा लूक चांगला राहिला तर त्यांचा मूडही नेहमी चांगला राहतो. त्यामुळे तुम्हाला वेळ मिळाला तर ऑफिसमध्ये मेकअपही करू शकता. फेशिअल वाइप्स चेहरा स्वच्छ करण्यासाठी असतं. मुलींच्या पर्स आणि वर्क डेस्कवर फेशिअल वाइप्स आवर्जून असायला हवं. जेणेकरुन तुमचं मेकअफ खराब होऊ नये.
मानेचा व्यायाम करत रहा -
(Image Credit : peterpanbtc.info)
ऑफिसमध्ये काम करत असताना सर्वात जास्त त्रास बॅक पेनचा होतो. या त्रासामुळे अनेकांचा मूड खराब होतो. ज्याच्या थेट प्रभाव त्यांच्या कामावर पडतो. बॅक पेनचं मुख्य कारण खुर्चीवर निट न बसणे हे असतं. या त्रासापासून वाचण्यासाठी अधून मधून मानेचा व्यायाम करत रहा.
जागेवरून उठा -
जर तुम्ही ऑफिसमध्ये सतत एका जागेवर बसून करुन थकले असाल तर जागेवरुन उठून जरा फिरून या. बाहेर एक फेरफटका मारुन या किंवा मित्रांशी गप्पा मारा. असे केल्याने शरीरात रक्तप्रवाह चांगला होतो आणि झोपही येणार नाही.